शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
3
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
4
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
5
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
6
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
7
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
8
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
9
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
10
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
11
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
12
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
13
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
14
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
15
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
18
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
19
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
20
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

येरळाचा पूल २५ दिवसांपासून पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 11:36 PM

वडूज : गेल्या महिनाभरापासून पडत असलेल्या पावसाने येरळवाडी तलाव अनेक वर्षांनी पूर्ण क्षमतेने भरले आणि येरळा नदीचे पात्र सध्य:स्थितीला ...

वडूज : गेल्या महिनाभरापासून पडत असलेल्या पावसाने येरळवाडी तलाव अनेक वर्षांनी पूर्ण क्षमतेने भरले आणि येरळा नदीचे पात्र सध्य:स्थितीला दुथडी भरून वाहत आहे. या नदीपात्रावरील मोराळे गावाच्या हद्दीत निमसोड व मायणी या मोठ्या गावांना जोडणारा पूल गेल्या २५ दिवसांपासून अद्याप पाण्यात असून, लोकांची मोठी गैरसोय होत आहे. या ठिकाणी पुलाची उंची वाढवण्याची मागणी लोकांमधून होत आहे.कलेढोण, मायणीहून निमसोड, औंध, रहिमतपूर यामार्गे साताऱ्याला जाणारा हा रस्ता वाहनचालकांना सोयीस्कर व जवळचा आहे. पुसेगाव किंवा पुसेसावळीमार्गे साताºयाला जाणाºया रस्त्यापेक्षा निमसोडमार्गे जाणारा हा रस्ता सध्या चांगल्या अवस्थेत आहे. व्यावसायिकदृष्ट्या या रस्त्याने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. परंतु मोराळे गावाच्या नजीक असणाºया पुलाची उंची अत्यंत कमी असल्याने अनेक वर्षांतून वाहिलेल्या येरळा नदीचे उसळून वाहणारे पाणी उरात धडकी भरवत आहे.सध्या पूल बंद असल्याने म्हासुर्णेमार्गे मायणी किंवा वडूजमार्गे मायणी असा १० ते १५ किलोमीटरचा प्रवास आहे. काही वर्षांपूर्वी हा पूल वाहून गेला होता. त्यानंतर बांधलेल्या पुलाचे काम कमी उंचीचेच करण्यात आले. परंतु सध्या नेर येथील तलाव व येरळवाडी तलाव यासह खटाव, सिद्धेश्वर कुरोली, वडूज, कातरखटाव, पळसगाव या भागातून येणाºया अनेक नदीपात्रात व ओढ्यात अनेक बंधारे भरून वाहू लागले आहे.येरळा नदीच्या पात्रात येणाºया पाण्याचे प्रमाण खूप आहे. अद्याप पावसाने उसंती घेतली नसल्याने आणखी अनेक दिवस हा पूल पाण्याखालीच राहण्याची शक्यता आहे. या पुलाची उंची वाढवण्याची गरज असल्याची मागणी जोर धरू लागली आहे .