शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

येळकोट येळकोट जय मल्हार; भंडाराच्या उधळणीत खंडोबा-म्हाळसा विवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 12:33 IST

उंब्रज : येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष, पिवळा धमक भंडारा व खोबऱ्याच्या तुकड्यांची उधळण करत लाखो वऱ्हाडी मंडळीच्या उपस्थितीत ...

उंब्रज : येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष, पिवळा धमक भंडारा व खोबऱ्याच्या तुकड्यांची उधळण करत लाखो वऱ्हाडी मंडळीच्या उपस्थितीत खंडोबा-म्हाळसा यांचा अनोखा विवाह सोहळा पार पडला. कऱ्हाड तालुक्यातील पाल येथे गोरजमुहूर्तावर हा सोहळा झाला. पिवळ्या धमक भंडाऱ्याची उधळण, सूर्यास्ताची किरणे यामुळे विवाहाच्या बोहल्यासह संपूर्ण पालनगरी सोन्याची नगरी झाल्याचे चित्र दिसत होते.

महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खंडोबा व म्हाळसा विवाह सोहळ्यासाठी लाखो वऱ्हाडी भाविक सोमवारी पाल येथे दाखल झाले होते. संपूर्ण यात्रा कालावधीत कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा, ग्रामपंचायत, यात्रा कमिटी, देवस्थान ट्रस्ट यांनी यात्रेची तयारी महिन्यापासून केली होती.

परंपरेनुसार दुपारी एक वाजण्याच्या सुमारास देवस्थान ट्रस्टने बनवलेल्या पूर्ण सागवानी स्वमालकीच्या रथातून मिरवणुकीची सुरुवात कऱ्हाड पंचायत समितीचे माजी सभापती प्रमुख मानकरी देवराज पाटील यांच्या वाड्यापासून झाली. या सोहळ्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातील प्रमुख मानकरी हे आपल्या मानाच्या गाड्यासह आले होते. यळकोट यळकोट जय मल्हार, सदानंदचा यळकोट असा गजर करत होते.

देवळात आरती झाल्यानंतर प्रमुख मानकरी देवराज पाटील यांनी खंडोबा व म्हाळसा यांचे मुखवटे पोटाला बांधून ते रथात बसले. सर्व मानाचे गाडे, मानकरी यांच्यासह मिरवणूक बोहल्याकडे निघाली. ही शाही मिरवणूक तारळी नदीवर बांधण्यात आलेला नवीन पूल ओलांडून विवाह मंडपात (बोहल्यावर) पोहोचली. त्यानंतर वऱ्हाडी मंडळींचा मानपानाचा विधी उरकण्यात आला. गोरज मुहूर्तावर श्री खंडोबा व म्हाळसा विवाह सोहळा पार पडला.

पोलिस प्रशासनाचा चोख बंदोबस्तलग्नसोहळ्यासाठी खंडोबा व म्हाळसा यांचे मुखवटे घेऊन मुख्य मानकरी देवळातून बाहेर पडतात. तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी होती. ही गर्दी नियंत्रित करणे ही मुख्य जबाबदारी पोलिस प्रशासनाची असते. यंदा या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिस प्रशासनाला यश आले. सातारा जिल्हा पोलिस दलातील विविध विभागातील पोलिस यंत्रणा आपल्यावर दिलेली जबाबदारी चोख पार पाडताना दिसून येत होते. त्यांच्यासोबत महसूल विभागाचे कर्मचारी व पोलिस पाटील संघटनाही कार्यान्वित झालेली दिसली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर