येळगावकरांनी काढली राष्ट्रवादीची लायकी!
By Admin | Updated: August 8, 2014 00:41 IST2014-08-07T22:18:57+5:302014-08-08T00:41:00+5:30
पाणीप्रश्न : केवळ टँकर लॉबी जपण्यासाठी दुष्काळग्रस्तांना झुलवल्याचा आरोप

येळगावकरांनी काढली राष्ट्रवादीची लायकी!
सातारा : ‘राष्ट्रवादीला जिहे-कठापूर पाणी योजना पूर्ण करायचीच नव्हती. माण-खटाव मधला दुष्काळ कायम ठेवून त्यांना केवळ टँकर लॉबी जोपासायची होती. गेल्या १७ वर्षांत सत्ता असतानाही ही योजना पूर्णत्वास गेली नाही, त्यामुळे राष्ट्रवादीची लायकी काय?, हे चांगलेच कळाले,’ अशी खरमरीत टीका माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी केली.
डॉ. येळगावकर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर गुरुवारी (दि.७) प्रथमच साताऱ्यात जाहीरपणे पत्रकार परिषद घेतली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. भरत पाटील, जिल्हा परिषदेचे खटाव येथील माजी सदस्य महेश शिंदे, रवींद्र पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘दुष्काळी भाग जलसिंचनाखाली आणू, असे आश्वासन देण्यात आल्याने आपण राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. अडीच वर्षे या पक्षात राहिलो; मात्र आपली पूर्ण निराशा झाली,’ असे डॉ. येळगावकर यांनी सांगितले.
डॉ. येळगावकर म्हणाले, ‘जिल्ह्याच्या वाट्याचं पाणी बाहेरील जिल्ह्यात पळवताना नियम बासनात गुंडाळले आहेत. माण, खटाव व कोरेगावला पाणी देताना जलसंपदा विभागाचे अधिकारी नियमावर बोट ठेवतात. मात्र, सांगोल्याला बिनदिक्कतपणे पाणी दिले जाते. १९९६ साली युती शासनाने जिहे-कठापूर योजनेला मंजुरी दिली. १९९७ नंतर आजअखेर तब्बल १७ वर्षे राष्ट्रवादी व काँगे्रस यांच्या आघाडीची सत्ता असून, देखील अवघ्या सहा किलोमीटर अंतरात जलवाहिनी टाकण्यासाठी भूसंपादन करता आलेले नाही. हे काम पूर्ण झाले असते तर नेर, येरळा, येरळवाडी धरण, आंधळी धरण व देवापूरचे धरण पाण्याने भरले गेले असते. यातून परिसरातील दुष्काळ मिटला असता, टँकरने पाणीपुरवठा करण्याची गरजही लागली नसती. मात्र, राष्ट्रवादीला टँकर लॉबी जोपासायची आहे. (प्रतिनिधी)
तालुकानिहाय अनुशेष भरावा, असा माझा आग्रह होता. मात्र, शरद पवारांनी महामंडळाचं भूत दुष्काळग्रस्तांच्या मानगुटीवर बसवलं. दुष्काळग्रस्तांचं राष्ट्रवादीला काही देणं-घेणं नाही, हे लक्षात आल्यावर मी लाथ मारून बाहेर पडलो आहे. लुंग्या-सुंग्यांनी माझ्यावर आरोप करू नयेत. कुठल्याही मंत्र्यानं पाणीप्रश्नावर बोलायला माझ्यासमोर स्टेजवर यावं, असेही जाहीर आव्हान डॉ. येळगावकर यांनी राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींना दिले.
११ रोजी येळगावकरांचे पक्षांतर
डॉ. दिलीप येळगावकर, राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य महेश शिंदे यांच्यासह काँगे्रस व राष्ट्रवादीतील अनेक नेतेमंडळी व कार्यकर्ते दि. ११ रोजी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. या प्रवेशासाठी सातारा, खटाव व कोळे, ता. कऱ्हाड येथे मेळावे आयोजित केले आहेत, अशी माहिती अॅड. भरत पाटील यांनी दिली.