वर्षानुवर्षे काळ्या आईची सेवा
By Admin | Updated: October 1, 2015 00:31 IST2015-09-30T21:26:21+5:302015-10-01T00:31:40+5:30
लक्ष्मण जाधव हे ६८ वर्षांचे आहेत. आता त्यांचे कष्ट करण्याचे वय नाही; परंतु तरुणांना लाजवेल, असे नांगरट, पेरणी, कुळवणी करीत आहेत

वर्षानुवर्षे काळ्या आईची सेवा
सूर्यकांत निंबाळकर-आदर्की --सकाळी पहाटे चार वाजता उठायचे, बैलजोडी चारून, नांगरणी आदी शेतीची कामे करण्यात आयुष्य सरल तरी आज ६८ वर्षे झाले तरी दिनक्रम तोच. त्याच उत्साहाने आदर्की खुर्द येथील लक्ष्मण बाबूराव जाधव काळ्या आईची सेवा करीत आहेत. फलटण तालुक्याचा पश्चिम भाग कायम दुष्काळी. त्यामुळे शेतीत जेवढं पेरल तेवढंच उगवून येईल याची खात्री नाही. जित्राबं जगवायची कशी, असा प्रश्न पडताना लक्ष्मणतात्यांनी घरची माळरान जमीन कसण्यासाठी बैल खरेदी केला; परंतु घरच्या शेती कसणे परवडत नाही. म्हणून गावातील छोट्या शेतकरी वर्गाची जमीन भाड्याने करायचे.
पत्नी दोन मुले अल्पशा अपंग आहेत. थोडी फार शाळा झाली आहे. पत्नी व एक मुलगा जिद्दी आहे. लक्ष्मण जाधव हे ६८ वर्षांचे आहेत. आता त्यांचे कष्ट करण्याचे वय नाही; परंतु तरुणांना लाजवेल, असे नांगरट, पेरणी, कुळवणी करीत आहेत. शेतीबरोबर लक्ष्मणतात्या आजही लग्न, बारशे, वास्तुशांतसाठी लागणारा मंडप बैलगाडीतून वाहतूक करतात.
परिस्थितीमुळे शाळेला रामराम केला व तरुणपणी शेती करीत पेरणी, नांगरणी शिकलो, पुढे घरची शेती केली. दुष्काळामुळे परवडत नसल्याने अन्य अनेकांची शेती करीत. सीमेवर सैनिक देशाचे संरक्षण करतात. आम्ही देशातील तमाम जनतेला अन्न पुरवतो. अनेकांना नोकरी मिळते. त्यांना पेन्शन मिळते; पण आम्हाला काय मिळते. शासनाने शेतकऱ्यांना पेन्शन सुरू करावी.
- लक्ष्मणतात्या जाधव