शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एक वर्षानंतर महिलेच्या खुनाचे गूढ उकलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 10:40 IST

सैदापूर, (ता. हामदाबाद) येथील वर्षभरापूर्वी महिलेच्या झालेल्या खुनाचे गूढ उलगड्यात सातारा तालुका पोलिसांना यश आले, असून हा खून आर्थिक व्यवहारातून झाला असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी एका युवकासह अल्पवयीन मुलाला पोलिसांनी पुण्यातून अटक केली.

ठळक मुद्देआर्थिक व्यवहारातून कृत्य एका युवकासह अल्पवयीन मुलाला अटक

सातारा : सैदापूर, (ता. हामदाबाद) येथील वर्षभरापूर्वी महिलेच्या झालेल्या खुनाचे गूढ उलगड्यात सातारा तालुका पोलिसांना यश आले, असून हा खून आर्थिक व्यवहारातून झाला असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी एका युवकासह अल्पवयीन मुलाला पोलिसांनी पुण्यातून अटक केली.सत्तार नन्नु शेख (रा.लातूर, सध्या रा. सुतारवाडी, पुणे) याच्यासह एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केली.याबाबत अधिक माहिती अशी, सातारा शहरालगत असणाऱ्या हामदाबाज येथील माती परीक्षण केंद्रात मिना आंनदराव देसाई (वय ५०) या राहत होत्या. त्या एका दवाखान्यात आयाचे काम करीत होत्या. त्यांच्या घराचे बांधकाम सत्तार शेख याने केल्याने त्यांची ओळख झाली होती. त्यानंतर दोघांच्यात आर्थिक व्यवहार होत होते.

त्यातूनच झालेल्या वादामुळे संयिताने रविवार दि. २९ डिसेंबर २०१८ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मिना यांचे दोन्ही हात व पाय प्लास्टिकच्या चिकट पट्टीने बांधले. त्यानंतर तोंडास प्लास्टिकची पिशवी बांधून गळ्याभोवती चिकट पट्टी बांधून त्यांचा खून केला होता.

या घटनेची तक्रार मृत मिना यांची मुलगी पूनम शशिकांत शेलार (वय २९, रा. तामजाईनगर, करंजे) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळावरून व इतर पुराव्यांच्या आधारे मारेकऱ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, संशयितांनी कोणताही ठोस पुरावा घटनास्थळी ठेवला नव्हता. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांना अनेक अडचणी येत होत्या.

खबऱ्याकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सुतारवाडी (पुणे) येथून सत्तार शेख या संशयिताला बेड्या ठोकल्या. त्याने मिना यांचा खून केल्याची कबुली दिली असून, या खूनात त्याच्या सोबत एक अल्पवयीन मुलगाही होता. या दोघांनी मिना यांच्या खूनासोबत सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक ट्रॅक्टर चोरल्याची कबुलीही पोलिसांकडे दिली आहे. पोलिसांनी संबंधित अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख, पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दादा परिहार, राजु मुलाणी, राजेश वंजारी, सुजीत भोसले, रमेश चव्हाण, संदीप कुंभार, सागर निकम, नितीनकुमार थोरात, नीलेश जाधव, महेंद्र पाटोळे यांनी केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस