छत्तीस वर्षांनंतर यंदा सर्वात मोठे उपवास
By Admin | Updated: June 19, 2015 00:24 IST2015-06-18T22:18:44+5:302015-06-19T00:24:59+5:30
रमजान महिन्यास प्रारंभ : बाजारपेठ फुलली

छत्तीस वर्षांनंतर यंदा सर्वात मोठे उपवास
सातारा : मुस्लिम समाजाचा पवित्र महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रमजान महिन्यास प्रारंभ झाला आहे. यंदाचे उपवास (रोजे) हे सुमारे १५ तासांचे असून गेल्या ३६ वर्षांनंतर एवढ्या मोठ्या कालावधीचे उपवास प्रथमच आले आहेत.
रमजान महिना हा चंद्रोदय-अस्त व सूर्यादय-सूर्यास्त यावर अवलंबून असतो. त्यामुळे वर्षांत किमान दहा ते बारा दिवस वर्षांतून कमी होत असल्याने यंदा ३६ वर्षांनंतर कालचक्राप्रमाणे पुन्हा मोठे उपवास आले आहेत.
या महिन्यातील मोठा उपवास हा १५ तास ४२ मिनिटांचा आहे तर इतर उपवास हे १४ तास ३० मिनिटांचे राहणार आहेत. रमजाननिमित्त बाजारपेठेत खरेदीची लगबग दिसून येत आहे. उपवासासाठी लागणारे विविध खाद्यपदार्थांचा दरवळ बाजारपेठेत जाणवत आहे. फराळाचे पदार्थ घेण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी होत आहे. (प्रतिनिधी)