मकरंद पाटलांसह ३१ जणांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा
By Admin | Updated: October 16, 2014 22:49 IST2014-10-16T22:02:11+5:302014-10-16T22:49:55+5:30
कोंढवली मारामारी : पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट

मकरंद पाटलांसह ३१ जणांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा
वाई : विधानसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी कोंढवली, ता. वाई येथील मारामारीप्रकरणी मकरंद पाटील व त्यांच्या ३१ समर्थकांवर गुन्हा दाखल झाला आहे. विकास शिंंदे यांनी याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
कोंढवली येथील काशिनाथ मारुती चोरट यांच्या घराशेजारी हातात तलवार, लोखंडी गज, लाकडी दांडके घेऊन बेकायदा जमाव जमवून विकास शिंदे यास ‘तू काँग्रेस पक्षाचे काम का करतोस,’ असे म्हणून चिडून जाऊन राष्ट्रवादी पक्षाचे मकरंद पाटील, विक्रम ऊर्फ भैय्या डोंगरे, योगेश रासकर, गणेश कदम, नितीन चौधरी, रोहित कचरे, सोनू जायगुडे (सर्व रा. वाई), विलास देशमुख (रा. सोळशी, ता. कोरेगाव), बंटी नारायण जाधव, अभिजित प्रमोद जाधव, योगेश जाधव, अक्षय किरण जाधव (सर्व रा. भुर्इंज), वीरेंद्र जाधव (रा. अनपटवाडी), रोहित मारुती वाडकर (रा. वाडकरवाडी), राजेंद्र गोविंंद धनावडे (रा. मांढरेवाडी, ता. वाई), प्रमोद मारुती जाधव, सचिन सहदेव गोळे (दोघे रा. वेलंग), रमेश सीताराम रावडे (रा. मुगाव), चंद्रकांत बबन सणस (रा. आसरे) यांनी व अनोळखी १२ लोकांनी लाकडी दांडक्याने, सळईने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात प्रवीण जयवंत वरे (रा. कुसगाव), समीर उत्तम जाधव (रा. वेलंग), किसनराव तुकाराम चिरगुटे (रा. मुगाव), राजेंद्र अर्जुन पाटील (रा. बावधन नाका, वाई), किरण नितीन शेलार (रा. एकसर) यांना मारहाण करून दुखापत केली. तसेच इंडिगो कार (एमएच ११ एके ९६१२), टोयाटो इनोव्हा (एमएच ११ बीएच ४२५४), मारुती सुझुकी (एमएच ११ बीएच ७२१२), तवेरा (एमएच ११ एडब्ल्यू ५३९२), फियास्टा (एमएच ११ एडब्ल्यू २०११) व विकास शिंदे यांची नवीन पांढऱ्या रंगाची टोयाटो फॉर्च्युनर कार या सहा वाहनांचे सुमारे ३० लाखांचे नुकसान केल्याचे शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. (प्रतिनिधी)