आदर्की खुर्दचा यात्राेत्सव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:51 IST2021-02-27T04:51:41+5:302021-02-27T04:51:41+5:30
आदर्की : आदर्की खुर्द (ता. फलटण) येथील श्री निष्णाई देवीचा यात्राेउत्सव दि. २८ व १ मार्च रोजी आयोजित करण्यात ...

आदर्की खुर्दचा यात्राेत्सव रद्द
आदर्की : आदर्की खुर्द (ता. फलटण) येथील श्री निष्णाई देवीचा यात्राेउत्सव दि. २८ व १ मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता. परंतु कोविड-१९ची राज्यात वाढती रुग्णसंख्या समोर ठेवून यात्राेत्सव रद्द करून निष्णाई देवीचा धार्मिक विधी मोजक्या लोकांच्या उपस्थित पार पडणार असल्याचे ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
आदर्की खुर्द (ता. फलटण) येथे निष्णाई देवीच्या मंदिरात लोणंद पोलीस स्टेशनचे कर्मचारी व यात्रा कमिटी, ग्रामस्थांची संयुक्तपणे बैठक पार पडली. निष्णाई देवीची यात्रा, उत्सवानिमित मानाची काठी उभी करणे, देवीची पालखी, पूजा, दंडवत आदी धार्मिक विधी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला.
यात्रा, उत्सवामध्ये होणारे तमाशा, कुस्त्या, मिरवणूक, खेळणी, पाळणे, मिठाई आदी दुकानांना बंदी घालण्यात आली आहे. निष्णाई मंदिरात गर्दी न करण्याचे आवाहनही यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.