शहाबाग तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी यशवंत जमदाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:47 IST2021-09-07T04:47:08+5:302021-09-07T04:47:08+5:30
वाई : शहाबाग येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी माजी उपसरपंच यशवंत जगन्नाथ जमदाडे यांची निवड करण्यात आली. ...

शहाबाग तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी यशवंत जमदाडे
वाई : शहाबाग येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी माजी उपसरपंच यशवंत जगन्नाथ जमदाडे यांची निवड करण्यात आली.
मावळते अध्यक्ष राजेंद्र नारायण जमदाडे यांचा कार्यकाल संपल्याने नूतन समिती सदस्यांची ग्रामसभेत निवड करण्यात आली.
सरपंच सारिका मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेस उपसरपंच शुभांगी जमदाडे, रचना ननावरे, सुनीता राजपुरे यांच्यासह शिवाजी जमदाडे, डॉ. अमर जमदाडे, महेंद्र जमदाडे, कैलास जमदाडे, प्रदीप जमदाडे, गणेश जमदाडे, वसंत भोरे, सागर जमदाडे, उमेश जमदाडे, बाळासाहेब कपुरे, संतोष राजपुरे, हणमंत राजपुरे, अजित जमदाडे, रवींद्र जमदाडे, संदीप कोरडे, बापू कोरडे, राजेंद्र जमदाडे, पप्पू जमदाडे, दीपक लोळे, रवींद्र कोरडे, अमोल गाढवे, रवी जमदाडे, शंकर ननावरे, ग्रामसेवक कृष्णात चव्हाण उपस्थित होत.
निवडीबद्दल आमदार मकरंद पाटील, शशिकांत पिसाळ, जिल्हा परिषद सदस्या शारदा ननावरे, प्रमोद शिंदे, चंद्रकांत काळे यांनी कौतुक केले.