कऱ्हाडच्या उपनगराध्यक्षपदी पुन्हा यादव

By Admin | Updated: July 15, 2014 01:28 IST2014-07-15T01:08:54+5:302014-07-15T01:28:41+5:30

समर्थकांचा आनंदोत्सव : नगराध्यक्षपदी साळुंखेंची अधिकृत निवड

Yadav again named as the Deputy Chairman of Karhad | कऱ्हाडच्या उपनगराध्यक्षपदी पुन्हा यादव

कऱ्हाडच्या उपनगराध्यक्षपदी पुन्हा यादव

कऱ्हाड : कऱ्हाड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी अ‍ॅड. विद्याराणी साळुंखे यांची औपचारिक घोषणा सोमवारी झाली तर अपेक्षेप्रमाणेच उपनगराध्यक्षपदी राजेंद्र यादव यांची दुसऱ्यांदा निवड झाली़ या दोन्ही निवड बिनविरोध झाल्याचे पिठासन अधिकारी शिरीष यादव यांनी जाहीर करताच समर्थकांनी आनंदोत्सव साजरा के ला़
नगराध्यक्षा प्रा़ उमा हिंगमिरे यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे नवीन नगराध्यक्षा निवडीचा कार्यक्र म जाहीर झाला होता़ विरोधी जनशक्ती आघाडीच्या अरुणा शिंदे यांनी निवडणुकीत सस्पेन्स तयार करण्याचा प्रयत्न केला़ मात्र, दोन दिवसांपूर्वी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे काढून घेतल्यानंतर अ‍ॅड़ विद्याराणी साळुंखे यांचा मार्ग मोकळा झाला होता तर उपनगराध्यक्ष पदासाठी राजेंद्र यादव यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने पिठासन अधिकारी शिरीष यादव यांनी दोन्ही निवडी बिनविरोध झाल्याचे घोषित केले़ यावेळी मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांची उपस्थिती होती़
दरम्यान, अ‍ॅड़ विद्याराणी साळुंखे व राजेंद्र यादव यांच्या निवडीची घोषणा होताच त्यांच्या समर्थकांनी मिरवणूक काढली. फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करीत त्यांनी डॉल्बीवर ठेका धरला़
लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सुभाष पाटील माजी नगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला़ त्यानंतर पी़ डी़ पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन केले़ (प्रतिनिधी)
 

Web Title: Yadav again named as the Deputy Chairman of Karhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.