शहरं
Join us  
Trending Stories
1
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
2
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
3
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
4
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
5
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
6
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
7
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
10
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
17
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
18
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
19
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
20
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
Daily Top 2Weekly Top 5

वाई तालुक्यात युवकांचा राडा

By admin | Updated: August 9, 2015 00:48 IST

लोहारे येथे हाणामारी : सात जण जखमी; दुचाकी जाळली, दहा जणांना कोठडी

वाई : एसटीत बसण्याच्या कारणावरून बोपर्डी व लोहारे गावांतील महाविद्यालयीन युवकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये सातजण जखमी झाले असून, याप्रकरणी दहा जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. न्यायालयाने सर्वांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी एका दुचाकीची मोडतोड करून जाळण्यात आली. तसेच पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. ही घटना शुक्रवारी रात्री नऊ वाजता लोहारे येथे घडली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. वाई पोलीस ठाणे व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, दोन महिन्यांपासून लोहारे व बोपर्डी गावांतील कॉलेजच्या युवकांमध्ये एसटीत बसण्यावरून अनेक छोटे-मोठे वाद सुरू होते. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास कॉलेजच्या रस्त्यावर दोन्ही गावांतील मुलांच्या गटांत बाचाबाची होऊन भांडण झाले होते़ याचा जाब विचारण्यासाठी बोपर्डीतील चार युवक लोहारे येथे गेले़ त्यावेळी तेथे असलेल्या युवकांबरोबर त्यांची मारामारी झाली. बोपर्डीतील युवकांनी फोनवर गावात या प्रकाराची माहिती दिल्यानंतर गावातील शंभर ते दीडशे युवक काठ्या घेऊन लोहारेमध्ये पोहोचले. दोन्ही गट एकमेंकांना भिडल्याने तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये महाविद्यालयीन युवकांसह ग्रामस्थही जखमी झाले. भांडणे सोडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या महिलांनाही मारहाण झाली. तसेच बोपर्डीतील चार व लोहारे येथील तीनजण गंभीररीत्या जखमी झाले़ जखमींना वाई व सातारा येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संतप्त झालेल्या युवकांना घटनास्थळी असलेली एका दुचाकीची तोडफोड करून ती पेटवून दिली. लोहारे गावामध्ये युवकांची मारामारी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी पाचगणी, महाबळेश्वर, मेढा, भुर्इंज येथून जादा कुमक मागविली होती. गावात पोहोचल्यानंतर पोलिसांनी सुरुवातीला जमाव पांगवला. मात्र, काही युवकांनी अंधारात लपून पोलिसांवरच दगडफेक केल्याने वातावरण आणखीनच चिघळले. त्यानंतर पोलिसांनी धरपकड करून काही जणांना ताब्यात घेतले, त्यामुळे पुढील अनर्थ टळला. (प्रतिनिधी)