वाई रोटरी क्लब धावला कलाकारांच्या मदतीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:45 IST2021-09-14T04:45:02+5:302021-09-14T04:45:02+5:30
वाई : कोरोनाच्या संकटात संपूर्ण जगच ठप्प झाले. अनेक छोटे-मोठे उद्योग, व्यवसाय बंद पडले. रोजगार गमावल्याने अनेकांवर ...

वाई रोटरी क्लब धावला कलाकारांच्या मदतीला
वाई : कोरोनाच्या संकटात संपूर्ण जगच ठप्प झाले. अनेक छोटे-मोठे उद्योग, व्यवसाय बंद पडले. रोजगार गमावल्याने अनेकांवर तर उपासमारीची वेळ आली. अशा काळातही अनेक सामाजिक संस्थांनी त्यांना माणुसकीच्या नात्याने मदत केली.
वाई रोटरी क्लबने ‘एक हात मदतीचा’ ही मोहीम राबवत अनेकांना आधार दिला.
लॉकडाऊनचे नियम जरी शिथिल झाले असले, तरी अनेक उद्योगधंदे सुरू होऊ शकले नाहीत, अनेकांच्या हाताला काम उरले नाही. त्यातील एक घटक म्हणजे कलाकार होय.
अजूनही मनोरंजनाचे कार्यक्रम करण्यावर सरकारने बंदी उठवलेली नाही. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील कलाकार मंडळींची खूप परवड होत आहे. त्यातच त्यांना थोडासा मदतीचा हात म्हणून वाई रोटरी क्लब पुढे सरसावला व सातारा परिसरातील तबलावादक, मृदंगवादक, गायक व इतर सर्व अशा एकूण ४० कलाकारांना अन्नधान्य कीटचे वाटप करण्यात आले. मुंबई येथील प्रोफेसर निषाद पवार व सातारा येथील अजय गायकवाड यांनी सर्वांपर्यंत पोहोचेल, याची जबाबदारी घेतली.
यासाठी वाई रोटरी क्लबच्या प्रत्येक सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.