कुस्ती पाटणची; मैदान कऱ्हाडच

By Admin | Updated: July 22, 2014 22:13 IST2014-07-22T21:53:43+5:302014-07-22T22:13:17+5:30

राजकीय गट सक्रिय : पाटण तालुका कऱ्हाड रहिवासी मित्रमंडळ कार्यरते

Wrestling Patanese; Maiden Karhad | कुस्ती पाटणची; मैदान कऱ्हाडच

कुस्ती पाटणची; मैदान कऱ्हाडच

प्रमोद सुकरे - कऱ्हाड
पाटण विधानसभा निवडणूक म्हटलं की ‘काँटे की टक्कर’ डोळ्यासमोर येते. या मतदारसंघातील सुमारे १५ हजार मतदार कऱ्हाड शहर व परिसरात आहेत. या मतदारांना आपलसं करण्यासाठी संभाव्य उमेदवारांनी फिल्डींग लावली आहे. देसाई आणि पाटणकर गटाच्या समर्थकांनी येथे ‘पाटण तालुका कऱ्हाड रहिवासी मित्र मंडळ’ कार्यरत केले असून नेत्यांचा राबता वाढल्याचे दिसत आहे.
कऱ्हाड आणि पाटण तालुक्याचा संबंध नेहमीच मैत्रीपूर्ण राहिला आहे. याच तालुक्यातून आलेल्या कोयना नदीचा कृष्णेशी प्रीतीसंगम कऱ्हाडातच झाला आहे. कोयना धरणाच्या उभारणीनंतर काही विस्थापीत गावांचं पुनर्वसन याच तालुक्यात झालं, शिवाय नोकरी, व्यवसाय, उद्योग धंदा, शिक्षण आदी कारणांमुळे अनेक पाटणकरांनी कऱ्हाडात राहणं पसंत के लंय शहरात पाटण कॉलनी नावाची जुनी एक कॉलनीही त्यांची साक्ष देते़ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं निवासस्थान याच कॉलनीत आहे़
पुनर्वसन झालेल्या गावातील लोक आता पक्के कऱ्हाडकर झाले आहेत़ त्यांचे रेशनिंग कार्ड अन् मतदारयादीही कऱ्हाडची आहे; पण काही कामानिमित्त कऱ्हाडात परिवारासह राहणारे पाटण तालुक्यातील सुमारे पाच हजार मतदार कऱ्हाडात आहेत़ ढेबेवाडी परिसरातून आलेले लोक विजयनगर, विमानतळ परिसरात राहतात. शिक्षणासाठी आलेल्यांनी विद्यानगर परिसरात राहणे पसंत केले़ इथं घरे बांधली पण त्यांची मनं पाटणकडेच आहेत़
पाटण विधानसभेच्या काही लढती पाहिल्या तर पाचशे हजाराच्या फरकाने झाल्यात. त्यामुळे कऱ्हाडात राहणारे ५ हजार मतदार त्यांच्यासाठी अमूल्य आहेत़ गत विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव झाल्यानंतर शंभूराज देसाईंनी ही गोष्ट ओळखली अन् सुमारे ३ वर्षापूर्वी अ‍ॅड़ मिलींद पाटील यांनी पाटण तालुका कऱ्हाड रहिवाशी मित्र मंडळ कार्यरत केले़ गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ, स्नेहमेळावा यांच्या माध्यमातून साखर पेरणी झाली़
गत वर्षी जरा उशिराच विक्रमसिंह पाटणकर यांनीही तोच कित्ता गिरवत माजी उपसभापती रमेश मोरेंच्या माध्यमातून असेच एक स्वतंत्र मित्रमंडळ कार्यरत केले आहे़ अन् विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून या मतदारांना आपलसं करण्याचा प्रयत्न सुरू केले आहेत़ त्यामुळे निवडणूक पाटणची असली तरी तयारी कऱ्हाडात सुरू झाल्याचे दिसत आहे़

---सन २००९ पर्यंत पाटण तालुक्यातील
कुंभारगाव जिल्हा परिषद मतदार संघ कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघ पाटणमध्येच राहिलाा; पण कऱ्हाड तालुक्यातील सुपने, तांबवे जिल्हा परिषद गट पाटण विधानसभेला जोडण्यात आलाय. १० हजारावर जास्त मतदार या गटात असल्याने पाटणच्या निकालाच्या चाव्या कऱ्हाडकरांच्या हातात आहेत.
राजकीय साटेलोटयाकडेही लक्ष !
----राजकारण, निवडणूका आल्या की मदतीची देवाण घेवाण आलीच ! कुंभारगाव गट कराड दक्षिणेत असताना पाटणचे नेते कऱ्हाडकरांना मदत करत होते़ आता सुपने-तांबवे गट पाटण मध्ये असल्याने परतफेड करण्याची संधी कऱ्हाडच्या नेत्यांवर आली आहे़ कोण कशी परतफेड करतय हे पाहण्यासाठी थोड थांबावच लागेल़

Web Title: Wrestling Patanese; Maiden Karhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.