मसूरमध्ये रंगला कुस्तीचा आखाडा

By Admin | Updated: February 10, 2015 23:58 IST2015-02-10T21:41:41+5:302015-02-10T23:58:57+5:30

एक लाखांची कुस्ती शेवटची नामांकित कुस्ती मसूर वाघेती येथील तन्वेर पटेल आणि राजाचे कुर्ले येथील माने यांच्या आमदार बाळासाहेब पाटील, मानसिंगराव जगदाळे यांच्या हस्ते लावण्यात आली

Wrestling akhada in lentil | मसूरमध्ये रंगला कुस्तीचा आखाडा

मसूरमध्ये रंगला कुस्तीचा आखाडा

मसूर : येथील श्री भैरवनाथ यात्रा कमिटी व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायती शेजारील कोल्हापूर पध्दतीच्या कुस्ती आखाडयात भरवण्यात आलेले कुस्त्यांचे जंगी मैदान कोल्हापूर, सांगली, व सातारा जिल्हयातून आलेल्या नामांकीत पैलवानांनी केलेल्या चटकदार कुस्त्यांनी गाजले. एक लाखांची कुस्ती शेवटची नामांकित कुस्ती मसूर वाघेती येथील तन्वेर पटेल आणि राजाचे कुर्ले येथील माने यांच्या आमदार बाळासाहेब पाटील, मानसिंगराव जगदाळे यांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्ती मैदानात दहा हजारांपासून एक लाखांपर्यंतच्या इनामी कुस्त्या झाल्या. मसूर पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस निरीक्षक गिरीष गायकवाड, प्रकाश कोकाटे, एस. जे. घाडगे, एस. पी. साळुंखे, सुधाकर भोसले, एस. व्ही. शेलार, संजय जगदाळे, यात्रा कमेटीचे अध्यक्ष वैभव गुरव, उपाध्यक्ष कपिल जगदाळे, खजिनदार महेश जगदाळे यांच्यासह हजारो कुस्ती शौकीन उपस्थित होते. कुस्ती मैदानाचे उद्घाटन राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार जगदाळे, उपसरपंच प्रशांत मोरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
पंच म्हणून शिवाजी माने, बेब्या काका, दिलावर मुल्ला, उत्तम बर्गे, प्रकाश पाटील, उत्तम जाधव, किसन माळी, दत्ता माने, बाजीराव गुरव, प्रकाश मोरे, संभाजी जगदाळे, प्रकाश पुजारी, सागर पाटोळे , बापूसाहेब जगदाळे, प्रविण पुजारी यांनी काम पाहीले.
शिवाजी महाडीक यांनी सूत्रसंचालन केले. कासम पटेल यांनी आभार मानले. (वार्ताहर)

Web Title: Wrestling akhada in lentil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.