शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडू, पश्चिम बंगालमधून प्रकल्प सहज बाहेर गेले असते?, अमोल कोल्हेंनी केला सवाल; म्हणाले..

By प्रमोद सुकरे | Updated: October 3, 2022 17:58 IST

मग केंद्राचा महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदलेल.

कऱ्हाड : महाराष्ट्रातून 'वेदांता' प्रकल्प जेवढ्या सहज गुजरातला गेला तेवढ्या सहज तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधून बाहेर गेला असता का? असा सवाल करीत प्रादेशिक अस्मिता टोकदार करा. मग केंद्राचा महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदलेल, असे मत  राष्ट्रवादीचे खासदार व अभिनेते अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.कराड येथे क्रिडाई संस्थेच्या नुतन कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. माजी राज्यपाल व खासदार श्रीनिवास पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आमदार बाळासाहेब पाटील, सुभाषराव जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.अमोल कोल्हे म्हणाले, खरंतर तुम्ही भाग्यवान आहात. महाराष्ट्रात कऱ्हाड आणि नांदेडलाच दोनवेळा मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली आहे. तर एकट्या बारामतीला चारवेळा संधी मिळाली आहे हा भाग वेगळाच. कऱ्हाडला शैक्षणिक क्षेत्राचा मोठा वारसा आहे.त्याचबरोबर बेळगाव सोडल्यावर मध्ये फक्त कऱ्हाडच वैद्यकीय ‘हब’ आहे. आणि ज्याठिकाणी शैक्षणिक आणि वैद्यकीयदृष्ट्या प्रगती आहे तेथे इतर प्रगतीला मोठी संधी असते. त्याचा फायदा सर्वांनी घ्यायला हवा.छत्रपती शिवाजी महाराज हा डोक्यावर घेऊन नाचण्याचा नव्हे तर डोक्यात घेण्याचा विषय आहे. त्यामुळेच सी बी एस ई अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास शिकविला जावा, यासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली असल्याचे अमोल कोल्हे यांनी सांगीतले.आग्रा भेटीचा थरार!लवकरच प्रदर्शित होणाऱ्या शिवप्रताप गरुडझेप या चित्रपटाबद्दल बोलताना ते म्हणाले, या चित्रपटात आग्रा भेटीचा थरार उलगडून दाखविला आहे. इतर राज्यात चंदन, सोने तस्कर यांच्यावर चित्रपट काढले  जातात. तेथील लोकांनी त्याला प्रतिसाद दिल्यानंतर ते इतर भाषेत डब होतात. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांवर असलेला हा चित्रपट एवढा लोकप्रिय करायचाय की तो इतर भाषेत डब झाला पाहिजे. म्हणजे छत्रपतींचा इतिहास सर्वदूर पोहोचेल.

ते कोणी सांगत नाहीकऱ्हाडला विमान उतरायला पाहिजे, त्याचं प्रशिक्षण मिळायला पाहिजे हे बरोबर आहे. मात्र, त्यामुळे बांधकाम व्यवसायावर मोठे संकट आले होते, हे अनेकजण सांगतात. ते सोडविण्यासाठी आमच्याकडे क्रिडाई संस्था आली. आम्ही त्यांना मदत केली. ते संकट दूर झालं. मात्र, ही अडचण कशामुळे आणि कोणामुळे आली, यावर कोणी बोलत नाही. असा चिमटा आमदार बाळासाहेब पाटील यांनी यावेळी काढला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हे