फलटणला अभ्यासपत्रिकेच्या सुधारित अभ्यासक्रमाची कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:14 IST2021-02-06T05:14:49+5:302021-02-06T05:14:49+5:30
फलटण : फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी महाविद्यालयात कला शाखेच्या तिसऱ्या वर्गाच्या हिंदी विषयाच्या ‘हिंदी साहित्य का इतिहास’ ...

फलटणला अभ्यासपत्रिकेच्या सुधारित अभ्यासक्रमाची कार्यशाळा
फलटण : फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी महाविद्यालयात कला शाखेच्या तिसऱ्या वर्गाच्या हिंदी विषयाच्या ‘हिंदी साहित्य का इतिहास’ या अभ्यासपत्रिकेच्या सुधारित अभ्यासक्रमाची ऑनलाइन एकदिवसीय कार्यशाळा झाली. मुधोजी महाविद्यालयातील हिंदी अभ्यास मंडळ, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा घेण्यात आली.
हिंदी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भोसले यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड होते. डॉ. क्षितिज धुमाळ व डॉ. शैलजा पाटील यांनी साधन व्यक्ती म्हणून आपली भूमिका पार पाडली. डॉ. बाळासाहेब बलवंत यांनी संबंधित अभ्यासपत्रिकेसंबंधी विद्यार्थी व प्राध्यापकांना अध्ययन व अध्यापनास उपयुक्त असे मार्गदर्शन केले.
द्वितीय सत्रामध्ये डॉ. संग्राम शिंदे व सुपर्णा संसुद्धी यांनी साधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन केले. डॉ. सुनील बनसोडे यांनी अभ्यासपत्रिकेच्या अध्यापनाबाबत मार्गदर्शन करून अंतर्गत मूल्यमापन या घटकासंदर्भात विशेष विवेचन केले. डॉ. गजानन भोसले, प्रा. परसराम रगडे, प्रा. सुचिता भोसले व प्रा. किरण सोनवलकर यांनी प्रातिनिधिक स्वरूपात कार्यशाळेच्या आयोजनाबाबत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. डॉ. नितीन धवडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. शौकत आतार व डाॅ. शिवाजी चवरे यांनी सूत्रसंचालन केले.