नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांची कार्यशाळा संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:37 IST2021-02-13T04:37:43+5:302021-02-13T04:37:43+5:30
राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा माहितीसाठी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांची एकदिवसीय कार्यशाळा तांबवे येथे नुकतीच संपन्न ...

नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांची कार्यशाळा संपन्न
राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा माहितीसाठी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांची एकदिवसीय कार्यशाळा तांबवे येथे नुकतीच संपन्न झाली
सातारा जिल्हा परिषद व कराड पंचायत समितीने आयोजित केलेल्या या कार्यशाळेत तांबवे गणातील तांबवे, साजूर,साकुडी,म्होप्रे,गमेवाडी, डेळेवाडी, बेलदरे,गमेवाडी,आरेवाडी, भोळेवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते,
जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार यांनी दीपप्रज्वलन करुन कार्यशाळेचे उद्घाटन केले.
यावेळी ग्रामपंचायतीस मिळणाऱ्या वित्त आयोगाच्या निधीबाबत,विकास आराखड्याबाबत गटविकास अधिकारी आबासाहेब पवार यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी आदर्श गाव पाटोदा, हिवरे बाजार,सर्वात श्रीमंत गाव अजनाळे, आदर्श आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळा वाबळेवाडी यांच्या माहितीपर चित्रफित दाखवण्यात आली.तांबवेचे ग्रामविकास अधिकारी टी.एल.चव्हाण यांनी स्वागत व प्रास्ताविक केले व ॲड.विजयसिंह पाटील यांनी आभार मानले.