शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखली फडात जाऊन ऊसतोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 15:17 IST

उसाचा पहिला हप्ता जाहीर केल्याशिवाय उसाच्या तोडीला होत लावू नका, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविवारी कारखान्यांना देण्यात आला होता. तरीही कारखान्यांच्या टोळ्यांनी ऊसतोड केल्याने याविरोधात सोमवारी दुपारी बारा वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पार्ले येथे सुरू असलेली ऊसतोड फडात जाऊन बंद पाडली.

ठळक मुद्देकऱ्हाड तालुक्यातील पार्ले येथे आंदोलन हप्ता जाहीर होईपर्यंत कोयता लावू देणार नसल्याचा इशारा

कऱ्हाड (जि. सातारा) ,दि. ३० : उसाचा पहिला हप्ता जाहीर केल्याशिवाय उसाच्या तोडीला होत लावू नका, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविवारी कारखान्यांना देण्यात आला होता. तरीही कारखान्यांच्या टोळ्यांनी ऊसतोड केल्याने याविरोधात सोमवारी दुपारी बारा वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पार्ले येथे सुरू असलेली ऊसतोड फडात जाऊन बंद पाडली.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, उपजिल्हाध्यक्ष दादासाहेब यादव, अनिल घराळ, कऱ्हाड तालुकाध्यक्ष प्रमोद जगदाळे, रोहित पाटील, बाळासाहेब पिसाळ, योगेश झांबरे, अमर कदम आदींची उपस्थिती होती.

कऱ्हाड तालुक्यातील गावांत ऊसतोड करण्यासाठी जिल्ह्यासह तालुक्यातील कारखान्यांच्या टोळ्या दाखल झाल्या आहेत. त्यांच्याकडून कोणत्याही क्षणी ऊसतोड करण्यास सुरुवात केली जाणार आहे.  मात्र, ऊसतोड घेण्यापूर्वी जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी आपला उसाचा पहिला हप्ता जाहीर करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली होती.

मात्र, पहिला हप्ता हा ३४०० रुपये जाहीर न करता कारखान्यांनी ऊसतोड सुरू केली. कऱ्हाड तालुक्यातील पार्ले येथे ऊसतोड टोळ्यांकडून सुरू करण्यात आली असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्याना मिळाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी जाऊन तोडी बंद पाडल्या.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी