फलटण : फलटणमध्ये राजेंच्या घरामध्ये मोठे घबाड सापडेल अशा संशयाने आलेल्या अधिकाऱ्यांच्या हाताला काही लागणार नाही. सर्व व्यवहार सुरळीत आहेत. एका एका रुपयाचा हिशोब आहे. मुळात त्यांचा नेता हा दोन नंबरवालाच नाही. फलटण म्हणजे काही बिहार नाही. इथे चुकीचे काही नाही हे अधिकाऱ्यांनाही कळले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अस्वस्थ होऊ नये असा सल्ला रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी दिला आहे.रघुनाथराजे म्हणाले, काळजीचे कारणच नाही. लोकांमध्ये संतापाची भावना आहे. पण, काहीच होणार नाही त्यामुळे त्यांनी अस्वस्थ होऊ नये. अधिकारी चौकशी करत आहेत. त्यांना प्रत्येक गोष्टीचा हिशोब दिला जात आहे. जे जुने आहे ते आहे. त्यात नवीन काही नाही. साप साप म्हणून जमीन धोपडण्याचा प्रकार होता तो तरी बंद होईल. तपास करणारे लोकही चांगला प्रतिसाद देत आहेत. अगदी व्यवस्थित सर्व रेकॉर्ड तपासत आहेत. त्यांच्याही लक्षात आले आहे की हे दोन नंबरचे घरच नाही. संजीवराजेंकडे सर्व गोष्टींचा हिशोब आहे. इनकम टँक्स मध्ये मिळालेले उत्पन्नाचा मार्ग आणि टँक्स व्यवस्थित भरला आहे की नाही. याची चौकशी होते. कार्यकर्त्यांना काळजी वाटतेय. पण, तसे काही नाही.
ते पुढे म्हणाले, माझे आजोबा सोशालिस्ट पार्श्वभूमीचे होते. संजीवराजे देखील तसेच आहेत. त्यामुळे सर्व व्यवस्थित आहे. पैशाचे ढीग सापडतील असे वाटले होते. पण, तशी काही परिस्थिती नाही. फलटण म्हणजे बिहार नाही जिथे पैशाचे ढीग सापडतील असे कोणाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे.
हा राँग नंबर आहे..रामराजे नाईक निंबाळकर आणि कुटुंबियांवर राजकारणातून दबाव टाकण्याचा हा प्रयत्न आहे का असे विचारले असता मला असे काही वाटत नाही. तरीही असे काही असले तर काहीच सापडणार नाही. हा राँग नंबर लागलेला आहे. असेच म्हणावे लागेल. त्यानिमित्ताने काय चौकशी व्हायची ती एकदा होऊन जाऊ देत अशी आमची भूमिका आहे.त्यांचा नेता दोन नंबरचा पुढारीच नाहीकार्यकर्ते विनाकारण काळजी करत आहेत. पण, त्यांनी काळजी करण्याचे काहीच कारण नाही. त्यांचा नेता हा कधीही दोन नंबरमधील नेता नाही. एक वेगळी राजकीय पार्श्वभूमी आमच्या घराण्याला आहे. त्यामुळे त्यांनी फार काळजी करु नये. असे मतही रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.