शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कामगारांच्या पीएफ, एसआयचे पैसे प्रेयसीच्या खात्यावर वळवले!, संशयिताला अटक अन् पोलिस कोठडी 

By नितीन काळेल | Updated: February 23, 2024 12:58 IST

रक्कम कामगारांच्या खात्यावर आॅनलाईन पाठविल्याच्या खोट्या पावत्याही केल्या

सातारा : सातारा शहराजवळील धनगरवाडी कोडोली येथील एका कंपनीच्या पर्यवेक्षकाने कामगाराचे पीएफ आणि एसआयची १५ लाख रुपयांची रक्कम प्रेयसीच्या बॅंक खात्यावर पाठवून फसवणूक केली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पर्यवेक्षकाला अटक झाली आहे. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी सोमनाथ रामचंद्र किर्दत (रा. चिंचणेर निंब, ता. सातारा) यांनी तक्रार दिलेली आहे. या तक्रारीनुसार कंपनी पर्यवेक्षक मंगेश रमेश दुदकर (रा. संगमनगर, सातारा) आणि त्याच्या प्रेयसीविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद झालेला आहे. दि. २ नोव्हेंबर २०२२ पासून १४ जानेवारी २०२४ पर्यंत संबंधित कंपनीत फसवणुकीचा हा प्रकार घडला आहे.पोलिसांनी सांगितले की, धनगरवाडी (कोडोली) येथील एका कंपनीचे बॅंक खाते होते. यामधील १५ लाख रुपयांची रक्कम ही कंपनी पर्यवेक्षक आणि अकाऊंटचे काम पाहणारा मंगेश दुदकर याने प्रेयसीच्या बॅंक खात्यावर वळती केली. १५ लाखांची ही रक्कम कंपनीतील कामगारांची पीएफ आणि एसआयची होती. त्याने कामगारांच्या खात्यावर रक्कम जमा केली नाही. तसेच ही रक्कम कामगारांच्या खात्यावर आॅनलाईन पाठविल्याच्या खोट्या पावत्याही केल्या होत्या. त्यामुळे मंगेश दुदकर आणि त्याच्या प्रेयसीविरोधात फसवणुकीचा तक्रार देण्यात आली.सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित मंगेश दुदकर याला अटक केली आहे. त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक शिरोळे हे तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस