वांगव्हॅली संघाचे कार्य कौतुकास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:29 IST2021-01-10T04:29:40+5:302021-01-10T04:29:40+5:30

तळमाव (ता. पाटण) येथील वाल्मिकी विद्यामंदिरात आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे ...

The work of the Wang Valley team is admirable | वांगव्हॅली संघाचे कार्य कौतुकास्पद

वांगव्हॅली संघाचे कार्य कौतुकास्पद

तळमाव (ता. पाटण) येथील वाल्मिकी विद्यामंदिरात आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार, प्राचार्य डॉ. अरुण गाडे, मुख्याध्यापक श्रीनिवास वाळवेकर, डॉ. चंद्रकांत बोत्रे, डॉ. सुभाष ताईगडे, डॉ. धनंजय कुंभार, डॉ. अजय सपकाळ, चंद्रकांत चव्हाण, संजय लोहार, मंडलाधिकारी प्रवीण शिंदे उपस्थित होते.

संतोष पवार म्हणाले, वांग व्हॅली संघाचे काम दीपस्तंभासारखे आहे. यापुढेही त्यांनी अशा प्रकारचे उपक्रम राबवावेत. कोरोनाकाळात काम केलेल्या लोकांचा सत्कार ही अभिमानाची बाब आहे. अशा उपक्रमांमुळे भविष्यात त्यांना काम करण्यास आणखी ऊर्जा मिळेल. वांग व्हॅलीने केलेला सत्कार त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे.

प्राचार्य डॉ. अरुण गाडे, चंद्रकांत चव्हाण, संजय लोहार, डॉ. चंद्रकांत बोत्रे, डॉ. सुभाष ताईगडे यांनी मनोगत व्यक्त केले.

फोटो : ०९केआरडी०४

कॅप्शन : तळमावले (ता. पाटण) येथे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांच्या हस्ते वैद्यकीय सेवकांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: The work of the Wang Valley team is admirable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.