गावच्या सार्वजनिक हितासाठी एकत्रित काम करावे - मिलिंद पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:44 IST2021-08-12T04:44:07+5:302021-08-12T04:44:07+5:30

अहिरे येथील संत सावता महाराज मंदिर सभामंडपाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे नेते मिलिंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत ...

To work together for the public interest of the village - Milind Patil | गावच्या सार्वजनिक हितासाठी एकत्रित काम करावे - मिलिंद पाटील

गावच्या सार्वजनिक हितासाठी एकत्रित काम करावे - मिलिंद पाटील

अहिरे येथील संत सावता महाराज मंदिर सभामंडपाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे नेते मिलिंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे सदस्य मनोज पवार, नियोजन समिती सदस्य शामराव गाढवे, उद्योजक नितीन ओव्हाळ, माजी उपसरपंच दत्तात्रय होले उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘अहिरे गावच्या संत सावता महाराज मंदिरासमोर हे सभामंडप झाल्याने गावच्या वैभवात भर पडली आहे. विकासाच्या प्रक्रियेत सर्वांना विश्वासात घेऊन काम केल्यास विकास गतिमान होतो. अहिरे गाव नेहमी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराची पाठराखण करणारे आहे. त्यामुळे येथील विविध कामांसाठी अधिकचा निधी पुरविण्यासाठी आमदार मकरंद पाटील नेहमी अग्रेसर असतात. गावच्या विकासासाठी एकत्रित काम केल्यास विकास प्रक्रिया सातत्याने सुरू राहते.’

Web Title: To work together for the public interest of the village - Milind Patil