शिक्षकांची कामे तातडीने मार्गी लावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:39 IST2021-03-20T04:39:16+5:302021-03-20T04:39:16+5:30
कराड येथे समितीच्या वतीने संवाद बैठक आरोजित केली होती त्यावेळी मुजावर बोलत होत्या. यावेळी तालुकाध्यक्ष अरुण पाटील, सरचिटणीस नारायण ...

शिक्षकांची कामे तातडीने मार्गी लावणार
कराड येथे समितीच्या वतीने संवाद बैठक आरोजित केली होती त्यावेळी मुजावर बोलत होत्या. यावेळी तालुकाध्यक्ष अरुण पाटील, सरचिटणीस नारायण सातपुते, शिक्षक समितीचे जिल्हा उपाध्यक्ष संजय नांगरे, शिक्षक बँकेचे संचालक सुभाष शेवाळे, शिक्षक बँकेचे माजी उपाध्यक्ष मोहनराव सातपुते, कराड पाटण शिक्षक सोसायटीचे संचालक आनंदराव थोरात, महिला शिक्षक समितीच्या तालुकाध्यक्ष रंजना चव्हाण, शशिकांत तोडकर, यशवंत जाधव, संपतराव साकुर्डे, शिवाजी भुसारी, दत्ता जाधव, आशुतोष गरुड, उमेश गुजले आदींची उपस्थिती होती.
शिक्षक समितीच्या वतीने प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित कामाच्या यादीसह निवेदन दिले, यात आंतरजिल्हा बदली शिक्षकांचे थकीत वेतन मिळावे ,आंतरजिल्हा शिक्षक व सेनानिवृत्त शिक्षकांचे जानेवारी २०१९ ते जून २०१९ चे ३ टक्के महागाई फरक बिल मिळणे आदी मागण्या करण्यात आल्या. त्याला मुजावर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी गटशिक्षणाधिकारी मुजावर यांनी कोरोना काळात उत्कृष्ट प्रशासकीय कामकाज केल्याबद्दल शिक्षक समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.