बोर्गेवाडी येथे नळ पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:42 IST2021-09-18T04:42:01+5:302021-09-18T04:42:01+5:30
चाफळ : डेरवण ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्र मोठे आहे. डेरवणसह बोर्गेवाडी, भैरेवाडी आदी गावांचा या ग्रामपंचायतीमध्ये समावेश होतो. सरपंच आशाताई यादव, ...

बोर्गेवाडी येथे नळ पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण
चाफळ :
डेरवण ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्र मोठे आहे. डेरवणसह बोर्गेवाडी, भैरेवाडी आदी गावांचा या ग्रामपंचायतीमध्ये समावेश होतो. सरपंच आशाताई यादव, उपसरपंच प्रकाश पाटोळे, मयूर यादव यांनी बोर्गेवाडी गावामध्ये जातीने लक्ष घालून कोरोना काळात आणि आता देखील विकासाभिमुख कामे करत गावचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला असल्याची प्रतिक्रिया बोर्गेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते नथुराम पांडुरंग मुसळे यांनी व्यक्त केली.
बोर्गेवाडी (डेरवण) ता. पाटण येथे डेरवण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून १४ व्या वित्त आयोगातून नूतन पाईपलाईन पूर्ण झालेल्या कामाचे उद्घाटन सरपंच आशाताई यादव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपसरपंच प्रकाश पाटोळे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक रावते, रामचंद्र पाटील, दिलीप जाधव, धनाजी यादव, मयूर यादव, नथुराम मुसळे, धनाजी बोर्गे, लक्ष्मण मुसळे आदींसह ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी व ग्रामस्थ, महिलांची उपस्थिती होती.