कऱ्हाड पालिकेत काळ्या फिती लावून काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:24 IST2021-09-02T05:24:58+5:302021-09-02T05:24:58+5:30
कऱ्हाड : ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेल्या असता त्यांच्यावर फेरीवाल्यांनी केलेल्या ...

कऱ्हाड पालिकेत काळ्या फिती लावून काम
कऱ्हाड : ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेल्या असता त्यांच्यावर फेरीवाल्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध येथील पालिकेत कर्मचारी व अधिकाऱ्यांनी केला. काळ्या फिती लावून मंगळवारी कामकाजात भाग घेतला. याप्रकरणी कडक कारवाई न झाल्यास कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या असताना एका फेरीवाल्याने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. यात पिंपळे यांची दोन बोटे तुटली असून, त्यांच्या अंगरक्षकाचेही एक बोट कापले गेले आहे. या घटनेच्या निषेधार्थ येथील पालिकेत सर्व अधिकार व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन निदर्शने केली. दिवसभर काळ्या फिती लावून कामकाजात भाग घेतला. यावेळी मुख्याधिकारी रमाकांत डाके, नगर अभियंता एम. एच. पाटील, अभियंता रफीक भालदार, ए. आर. पवार, मिलिंद शिंदे, प्रदीप भोकरे, माणिक बनकर, इखलास शेखर, रवि ढोणे, आनंदा खवळे, मारुती काटरे यांच्यासह पालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
फोटो