लिपिक संवर्ग संघटनेचे काळ्या फिती लावून काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:41 IST2021-09-03T04:41:53+5:302021-09-03T04:41:53+5:30
सातारा : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने कृषी विभागातील लिपिकांना तहसील कार्यालयातील इतर कामे देण्यात आली आहेत. याचा निषेध करत ...

लिपिक संवर्ग संघटनेचे काळ्या फिती लावून काम
सातारा : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने कृषी विभागातील लिपिकांना तहसील कार्यालयातील इतर कामे देण्यात आली आहेत. याचा निषेध करत लिपिक संवर्ग कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम करण्यास सुरुवात केली आहे.
याबाबत महाराष्ट्र राज्य कृषी विभाग लिपिक संवर्ग संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, जिल्ह्यात लिपिक संवर्गीय कर्मचाऱ्यांची ८९ पदे मंजूर आहेत. त्यामधील ४९ पदे भरलेली असून, ४० रिक्त आहेत. त्यानुसार उपविभाग, तालुकास्तरीय सर्व कार्यालयात ५० टक्क्यांहून लिपिक पदे रिक्त आहेत. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने यामधील काही कर्मचाऱ्यांना तहसील कार्यालयातील कामासाठी घेतले आहे. अतिवृष्टीच्या कामासाठी घेतले असतानाही त्यांना विविध प्रकारची कामे लावण्यात येत आहेत. याला कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. याचा निषेध करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम करण्यास सुरुवात केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश रद्द न केल्यास ६ सप्टेंबरपासून लिपिक संवर्गीय सर्व कर्मचारी सामूहिक रजेवर जातील, असा इशाराही संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.
फोटो ०२सातारा ॲग्री फोटो...
फोटो ओळ : महाराष्ट्र राज्य कृषी विभाग लिपिक संवर्ग संघटनेने काळ्या फिती लावून काम करण्यास सुरुवात केली आहे.
...........................................................