वडूजच्या आठवडा बाजारातून पर्स लांबवली

By Admin | Updated: July 2, 2017 16:47 IST2017-07-02T16:47:56+5:302017-07-02T16:47:56+5:30

वडूज पोलिस ठाण्यात नोंद

The wool of waduz week ended the purse | वडूजच्या आठवडा बाजारातून पर्स लांबवली

वडूजच्या आठवडा बाजारातून पर्स लांबवली

आॅनलाईन लोकमत

वडूज , दि. 0२ : येथील आठवडा बाजारातून महिलेची पर्स लांबविण्यात आली. या पर्समध्ये सोन्याचे तीन तोळ्याचे गंठण, दोन मोबाईल, बँकेची दोन एटीएम याच्यासह महत्वाची कागदपत्रे होती. या चोरीत सुमारे ६५ रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे. झाली आहे.

याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, वडूज येथील एक महिला आठवडा बाजार असल्याने वडूजच्या बाजारत गेली होती. त्यावेळी पर्समध्ये भाजीपाला घेण्यासाठी लागणारे पैसे तसेच तीन तोळ्यांचे सोन्याचे गंठण व महत्वाची कागदपत्रे असा ६५ हजार रुपये किंमतीचा ऐवज होता.

बाजार करत असताना अज्ञात चोरट्याने पिशवीत ठेवलेली पर्स लंपास केल्याचे संबंधित महिलेच्या लक्षात आले. त्यावेळी तातडीने त्यांनी वडूज पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. हवालदार अशोक वाघमारे हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: The wool of waduz week ended the purse