महिला दक्षता समितीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:26 IST2021-06-19T04:26:31+5:302021-06-19T04:26:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : राज्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये महिला दक्षता समितीची महिन्यातून एकदा बैठक घेण्यात यावी. महिला अत्याचारांवरील ...

Of the Women's Vigilance Committee | महिला दक्षता समितीची

महिला दक्षता समितीची

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : राज्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये महिला दक्षता समितीची महिन्यातून एकदा बैठक घेण्यात यावी. महिला अत्याचारांवरील संरक्षण कायद्यांची समग्र माहिती पोलीस स्टेशनमधील प्रत्येक कर्मचाऱ्यास अवगत करावी, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केल्या.

येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या महिला दक्षता समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) राजवर्धन सिन्हा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्यासह अकोला, रायगड, चंद्र्रपूर, अहमदनगर, बुलढाणा, बीड व सोलापूर (ग्रामीण) येथील पोलीस अधीक्षक उपस्थित होते.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, लॉकडाऊनमुळे महिला अत्याचारांवरील पाठपुरावा न झालेल्या गुन्ह्यांचा प्राधान्याने तपास करुन गुन्हे नोंद करावेत. स्थलांतरित होणाऱ्या कामगारांच्या मुलींच्या सुरक्षिततेबाबत कार्यपद्धती निश्चित करावी. दर महिन्याला दक्षता समितीची बैठक घेऊन महिला दक्षता समितीमार्फत काय करावे, याबाबत पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करावे. प्रत्येक शासकीय कार्यालयातील लैंगिक शोषणाच्या तक्रारींवर उपविभागीय पोलीस कार्यालयामार्फत कार्यवाही करावी. सोशल मीडियावरून स्त्रियांच्या बाबतीत नकारात्मक टीका-टिप्पणीवर त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या.

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, सातारा जिल्ह्यात कोणत्याही अत्याचारित महिलेने निनावी पत्राद्वारे तक्रार केल्यास त्यावर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून त्वरित कार्यवाही करण्यात येते. स्त्रियांवरील अत्याचाराबाबत मंत्रालयस्तरावर राज्याचे पोलीस महासंचालक, राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) व संबंधित सर्व पोलीस महानिरीक्षक यांच्यासोबत बैठक घेऊन नवीन कार्यपध्दती आखण्यात येईल व ती लवकर कार्यान्वित करुन अशा आरोपींना लवकरात लवकर शिक्षा करणे, अशा प्रकारचे गुन्हे घडणारच नाही अशा प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येतील.

Web Title: Of the Women's Vigilance Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.