कऱ्हाडात महिलेचा खून

By Admin | Updated: June 15, 2014 00:15 IST2014-06-15T00:07:32+5:302014-06-15T00:15:20+5:30

अज्ञाताविरुद्ध गुन्हा : अंगणात झोपेत असताना डोक्यात प्रहार

Women's blood in Karhad | कऱ्हाडात महिलेचा खून

कऱ्हाडात महिलेचा खून

कऱ्हाड : घरासमोरील अंगणात झोपलेल्या महिलेच्या डोक्यात अवजड शस्त्राने प्रहार करून तिचा खून करण्यात आला़ शहरातील कृष्णा नाका परिसरातील शिखरे वस्तीत शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली़ माया जगन्नाथ जगताप (वय ४५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे़
शहरातील कृष्णा नाक्यापासून काही अंतरावर असलेल्या शिखरे वस्तीत अभिजित अरविंद अष्टेकर यांची जागा आहे़ या जागेत खोली बांधून माया जगताप यांच्यासह त्यांची विवाहित मुलगी अमृता कांबळे, जावई बाळू श्रीपती कांबळे व नातू राज हे तिघेजण राहण्यास आहेत़ माया जगताप या कृष्णा नाक्यावरील एका चायनीज सेंटरवर भांडी धुण्याचे काम करीत होत्या़ त्यांची मुलगी अमृता व जावई बाळू हे दोघेजण जागामालक अभिजित अष्टेकर यांच्या वीटभट्टीवर मजूर म्हणून कामास आहेत़
शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे माया जगताप या कामावरून घरी आल्या़ मुलगी, जावई व नातवासोबत त्यांनी जेवण केले़ रात्री १२ वाजण्याच्या सुमारास त्या घरासमोरील अंगणात झोपण्यास गेल्या़, तर मुलगी अमृता, जावई बाळू व नातू राज हे तिघेजण घरामध्येच झोपले़ माया जगताप या घरात चोरी होण्याच्या भीतीने दररोज झोपताना घराच्या दरवाजाला बाहेरून कुलूप लावत असत़ तसेच कुलपाची चावी तेथेच लपवून ठेवत़ शुक्रवारी रात्रीही त्यांनी घराला बाहेरून कुलूप लावले़ त्यानंतर त्या झोपण्यासाठी गेल्या़ शनिवारी सकाळी अमृत यांनी आईला हाक मारून दरवाजा उघडण्यास सांगितले. मात्र, बराचवेळ बाहेरून कसलाच प्रतिसाद मिळाला नाही़ अमृता यांच्या हाका ऐकून शेजारीच राहणाऱ्या रेणुका कांबळे व वंदना सर्वगौड या दोन महिला त्याठिकाणी आल्या़ त्यावेळी माया यांच्या डोक्यातून रक्त येत असल्याचे रेणुका यांना दिसले. शेजाऱ्यांनी दरवाजाचे कुलूप तोडल्यानंतर अमृता व बाळू यांना घराबाहेर आले़ अमृता कांबळे यांनी याबाबतची माहिती पोलिसांत दिली़ (प्रतिनिधी)

Web Title: Women's blood in Karhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.