फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणी आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरही आरोप सुरू आहेत, दरम्यान, आज फलटणमध्ये जाहीर सभा घेत निंबाळकर यांनी सर्व आरोप फेटालून लावले. यावेळी महिलांची मोठी गर्दी होती. महिलांनी नाईक निंबाळकर यांचे पाय धुतले, दृष्ट काढली आणि दुग्धाभिषेक केला. यावेळी रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर झाले.
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
यावेळी नाईक निंबाळकर यांनी आरोप फेटाळून लावले. त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. आपल्यावर करण्यात आलेले आरोप हे मास्टरमाईंडच्या सांगण्यावरुन करण्यात आले आहेत, मी नार्को टेस्टला तयार आहे, माझ्यावर आरोप करणाऱ्यांनीही तयार व्हावं नाहीतर निंबाळकर नाही असं जाहीर करावं असं आव्हान माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी रामराजे निंबाळकरांना दिले. मला गोळी घातली तरी चाललं असतं, पण किती बदनामी करता? असा सवालही केला.
आपल्याला बदलाव आणायचा आहे, बदला घ्यायचा नाही. तालुक्यातील ६० टक्के जनता आपल्यासोबत आहे. मुख्यमंत्र्यांना कोणत्याही रिपोर्टची गरज नव्हती. मी त्यांना मातीसाठी भेटलो, काही वैयक्तिक मागितले नाही. चॅलेंज दिल म्हणून मी बोलत आहे. चॅलेंज कुणाला देताय? विधान परिषदेच्या आमदारामुळे तालुक्याची बदनामी झाली. शेर को धमका सकते हो, डरा नहीं सकते. मी नार्को टेस्ट करायला तयार आहे. माझ्यावर आरोप करणारे तयार आहेत का?, असंही नाईक निंबाळकर म्हणाले. ज्या मुकादमावर आम्ही गुन्हा नोंद केला, त्याचे मेडिकल हे संपदा मुंडे यांनी केलं नाही. आता तो सगळ्यांना सांगतोय की त्याचे मेडिकल मुंडेंनी केले म्हणून असा आरोप निंबाळकरांनी केला.
Web Summary : Ranjitsinh Nimbalkar denied allegations in Dr. Munde's suicide case at a Phaltan rally. Women showed support, washing his feet. He challenged opponents to a narco test and criticized them for defamation.
Web Summary : फलटण रैली में रणजितसिंह निंबालकर ने आरोपों का खंडन किया। महिलाओं ने समर्थन दिखाया, पैर धोए। उन्होंने विरोधियों को नार्को टेस्ट की चुनौती दी और बदनामी करने के लिए उनकी आलोचना की।