शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनीच पुढे होऊन संघर्ष करत भाजपचे सरकार हटवण्याचा निर्धार करावा-सुधा सुंदरामन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 12:55 IST

आगामी निवडणुकीतून केंद्रातील भाजपचे सरकार पुन्हा सत्तेत येऊ द्यायचे नाही असा निर्धार करावा

सातारा : ‘महिलांवरील अत्याचारांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. केंद्रातील सरकार सर्वांना मूर्खात काढत आहे. यामुळेच या देशात महिलांनीच पुढे होऊन संघर्ष पुकारून आगामी निवडणुकीतून केंद्रातील भाजपचे सरकार पुन्हा सत्तेत येऊ द्यायचे नाही असा निर्धार करावा,’ असे आवाहन अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा कॉ. सुधा सुंदरामन यांनी केले.अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे बारावे राज्य अधिवेशन सातारा येथील वेदभवन मंगल कार्यालयात उभारलेल्या कमल वानले नगरातील उषा दातार सभाग्रहात सुरू झाले.  यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी राज्य अध्यक्षा कॉ नसिमा शेख होत्या. यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या माजी खासदार वृंदा करात, स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. अशोक भोईटे, राष्ट्रीय महासचिव मरियम ढवळे, राज्य सेक्रेटरी प्राची हातिवलेकर, अंगणवाडी संघटनेच्या नेत्या कॉम्रेड शुभा शमीम, कॉ. उदय नारकर, कॉ. एम ए शेख, सुटाचे प्रा. डॉ आर के चव्हाण , विजय मांडके , माणिक अवघडे , वसंतराव नलावडे , मिनाज सय्यद उपस्थित होते.सुधा सुंदरामन म्हणाल्या, महिलांच्या प्रश्नावर जनवादी महिला संघर्ष करीत आहेत. विषमतेवर आधारलेली शोषणव्यवस्था बदलण्यासाठी जनवादी महिला संघटना आग्रही आहे. पुरुषसत्ता आणि भांडवलदारी सत्ता तसेच जातीयवाद यांचे आव्हान आपल्यापुढे आहे. ते आव्हान स्वीकारून आपण त्याविरोधात एल्गार पुकारत आहोत.माजी खासदार वृंदा करात म्हणाल्या, भाजपची प्रवृत्ती येथील सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या तसेच भाईचाऱ्याच्या संस्कृतीवर घाला घालीत आहे. त्याविरोधात आपली विचारधारा आहे. त्यास अधिक मजबूत करणे गरजेचे आहे.प्रारंभी संघटनेचा ध्वज उभारून आणि महिलांच्या संघर्ष व आंदोलनात ज्यांचे निधन झाले अशा नेत्यांना व कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. अशोक भोईटे, कॉ उदय नारकर, कॉ शुभा शमीम, कॉ. एम. ए. शेख आदींची भाषणे झाली. सभेच्या अध्यक्षा जनवादी महिला संघटनेच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष कॉम्रेड नसीम शेख यांचेही यावेळी अध्यक्षीय भाषण झाले. सूत्रसंचालन जनवादी च्या महाराष्ट्राच्या सरचिटणीस प्राची हातिवलेकर यांनी केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाWomenमहिला