महिलांनी हक्क, अधिकाराबाबत जागृत राहावे : शुभदा नागपूरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:14 IST2021-02-06T05:14:16+5:302021-02-06T05:14:16+5:30

वाई : बदलत्या आधुनिक युगात तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभाव व उपयोगाबरोबर विविध समस्या, आव्हानेही निर्माण झाली आहेत. दैनंदिन जीवनात ग्राहक ...

Women should be aware of their rights: Shubhada Nagpurkar | महिलांनी हक्क, अधिकाराबाबत जागृत राहावे : शुभदा नागपूरकर

महिलांनी हक्क, अधिकाराबाबत जागृत राहावे : शुभदा नागपूरकर

वाई : बदलत्या आधुनिक युगात तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभाव व उपयोगाबरोबर विविध समस्या, आव्हानेही निर्माण झाली आहेत. दैनंदिन जीवनात ग्राहक म्हणून महिलांची मोठी भूमिका असते. महिलांनी अशावेळी आपल्या हक्क, अधिकाराबाबत जागृत राहावे, असे मत ग्राहक पंचायतच्या अध्यक्षा शुभदा नागपूरकर यांनी व्यक्त केले.

यावेळी लेखिका पूनम ससाणे, रोहिणी यादव, ज्योती जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

पूनम ससाणे म्हणाल्या, ‘सध्या स्पर्धेच्या युगात कौशल्य शिक्षणाशिवाय पर्याय नाही. नोकरी, व्यवसायामध्ये कोणत्याही प्रकारची संधी प्राप्त करावयाची झाल्यास तांत्रिक, व्यवसायाभिमुख शिक्षण घेणे काळाची गरज आहे. ब्यूटिशियन रोहिणी यादव, ज्योती जगताप यांनीही महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य विनोद शिंगटे, नयना भिलारे, दीप्ती शिंगटे, मनीषा ओंबळे, शीतल गाढवे, रोहित नेवसे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास महिला, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Web Title: Women should be aware of their rights: Shubhada Nagpurkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.