शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

दोन गावांतील महिलांची एकमेकींना शिव्यांची लाखोली, महाराष्ट्रातील 'या'गावात आगळी-वेगळी परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 12:25 IST

ही प्रथा आज २१ व्या शतकातही सुरू आहे. ही प्रथा बंद करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अनेक प्रयत्न केले. मात्र, बोरीचा बार ही प्रथा बंद पडली नाही.

खंडाळा : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील वेगळेपण जपणारा उत्सव म्हणून ‘बोरीचा बार’ ओळखला जातो. सुखेड-बोरी या दोन गावांतील महिला गावच्या सीमेवरील ओढ्याजवळ येऊन एकमेकींना शिव्यांची लाखोली वाहण्याची ही परंपरा शेकडो वर्षांपासून आजही जपली आहे. दोन वर्षांच्या कोरोनानंतर यावर्षी उत्साहात सोहळा संपन्न झाला. विशेषतः खंडाळ्याचा ‘बोरीचा बार’ सोशल मीडियातून सातासमुद्रापार पोहोचला आहे.सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी चक्क शिव्यांची लाखोली वाहण्याचीच परंपरा आहे. सुखेड-बोरी या दोन गावांच्या दरम्यान असलेल्या ओढ्यालगत दरवर्षी नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी ‘बोरीचा बार’ रंगतो. एकमेकींना शिव्या दिल्या जातात. संगतीला डफडे अन् हलगीचा कडकडाट आणि तुतारीची ललकारी सुरू असते. याच निनादात दोन्ही बाजूकडील महिलांमध्ये उत्साह संचारतो.

सुखेड व बोरी या दोन्ही गावांतील शेकडो महिला वाजतगाजत ग्रामदेवताचे दर्शन घेऊन गावाच्या वेशीवरील सरहद्देच्या ओढ्यावर येऊन पावसाच्या संततधारेत ‘बोरीचा बार’ घालतात. वर्षातून एकदाच उत्साहाने शिव्यांची लाखोली वाहिली जाते. त्यानंतर प्रतिस्पर्धी गटातील महिलेला ओढून आणले जाते. या महिलेला गावात नेऊन साडीचोळी देऊन ओटी भरली जाते. जगावेगळा हा सोहळा पाहण्यासाठी जिल्ह्यातूनच नव्हे, तर परजिल्ह्यातून हजारो लोक दाखल होत असतात. यावर्षी मोठ्या उत्साहात हा समारंभ पार पडला.

दंतकथा अन् प्रथा...या बोरीच्या बार संदर्भात एक दंतकथा आहे. एक पाटील होते. त्यांना दोन बायका होत्या. पैकी एक सुखेड, तर दुसरी बोरी या गावातील होत्या. त्या दररोज दोन्ही गावांची शिव असणाऱ्या ओढ्यावर धुणे धुण्यासाठी येत होत्या. ओढ्यावर दोघी एकत्र आल्यावर त्यांच्यात वाद होऊन दोघी एकमेकींना हातवारे करीत शिव्या द्यायच्या. यावरून या ‘बोरीचा बार’ अशी प्रथा असल्याचे ग्रामस्थ सांगतात. ही प्रथा आज २१ व्या शतकातही सुरू आहे. ही प्रथा बंद करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अनेक प्रयत्न केले. मात्र, बोरीचा बार ही प्रथा बंद पडली नाही.

‘बोरीचा बार’ हा आगळावेगळा पारंपरिक उत्सव म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातो. दरवर्षी मोठ्या उत्साहात ही परंपरा जोपासली जाते. यासाठी लोकांची मोठी गर्दी होत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून हा उत्सव सातासमुद्रापार पोहोचला आहे. - रमेश धायगुडे, सुखेड 

सांस्कृतिक परंपरेतील या वेगळ्या उत्सवामुळे बोरी गावचे नाव महाराष्ट्राच्या नकाशावर कोरले आहे. दोन्ही गावांतील महिला आनंदाने सहभागी होतात. त्वेषाने शिवीगाळ होत असली तरी त्यानंतर प्रेमाने एकमेकांशी वागतात. - मयूरी धायगुडे, बोरी

टॅग्स :Satara areaसातारा परिसर