करंजे गावातील महिलांचा पाण्यासाठी रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:44 IST2021-09-23T04:44:29+5:302021-09-23T04:44:29+5:30

करंजे : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी करंजे गावातील महिलांनी चक्क जुना हायवेवर रास्ता रोको आंदोलन केले. करंजे ...

The women of Karanje village block the road for water | करंजे गावातील महिलांचा पाण्यासाठी रास्ता रोको

करंजे गावातील महिलांचा पाण्यासाठी रास्ता रोको

करंजे : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी करंजे गावातील महिलांनी चक्क जुना हायवेवर रास्ता रोको आंदोलन केले. करंजे गावात तीन नगरसेवक असूनही गावातील लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा गेली कित्येक वर्षांपासून मार्गी लावताना तिन्ही नगरसेवकांना अपयश आले आहे.

करंजे गावातील काही भागात पाणी पुरवठा हा व्यवस्थितरित्या केला जातो. परंतु काही भागात निवडणूक झाल्यापासून पाणी पुरवठा हा जाणूनबुजून विस्कळीत केला जातो, असा आरोप येथील स्थानिक नागरिक करत आहेत. गेले सहा महिने झाले ज्या ठिकाणी नागरिकांनी आंदोलन केले. तेथील स्थानिक नागरिकांना विचारले असता दर दोन दिवसांनी अवघा दहा मिनिटे पाणी पुरवठा होत आहे व दहा मिनिटे येणारे पाणी कमी दाबाने येत असून, फक्त एक ते दोन भांडी भरतात. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा व घरात इतर वापरासाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे महिलांनी टोकाचा निर्णय घेत सरळ हायवेवर भांडी मांडून व स्वतः तेथे उभे राहून रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी झाली. त्याचबरोबर वाहतूक कोंडी झाल्याने वाहतूक पोलिसांना यावे लागले. काही वेळाने नगरसेवक बाळासाहेब ढेकणे, नगरसेवक ज्ञानेश्वर फरांदे व पाणी पुरवठा सभापती रामभाऊ हादगे तेथे आल्यानंतर नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. बराच वेळ नागरिक व त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर कसेबसे करून नागरिकांना शांत करण्यात आले व त्वरित पाणीपुरवठा सुरळीत करून दिला जाईल आणि दररोज किमान अर्धा तास पाणी पुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. लवकरात लवकर पाणी पुरवठा चालू करून देऊ, असे सांगण्यात आले.

फोटो आहे...

२२करंजे

करंजे गावातील महिलांनी बुधवारी पिण्याच्या पाण्यासाठी चक्क जुना हायवेवर रास्ता रोको आंदोलन केले.

Web Title: The women of Karanje village block the road for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.