महिलेच्या खुनाचे गूढ कायम

By Admin | Updated: June 16, 2014 12:21 IST2014-06-16T12:21:43+5:302014-06-16T12:21:43+5:30

शहरातील कृष्णा नाका परिसरातील शिखरे वस्तीवर झालेल्या महिलेच्या खुनाचे गूढ अद्याप कायम आहे. खुनाचे कारणही अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच आरोपींबाबतची कसलीही ठोस माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाही.

The woman's mystery remains intriguing | महिलेच्या खुनाचे गूढ कायम

महिलेच्या खुनाचे गूढ कायम

कर्‍हाड : शहरातील कृष्णा नाका परिसरातील शिखरे वस्तीवर झालेल्या महिलेच्या खुनाचे गूढ अद्याप कायम आहे. खुनाचे कारणही अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच आरोपींबाबतची कसलीही ठोस माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाही.
माया जगन जगताप (वय ४५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. माया जगताप या त्यांची विवाहित मुलगी अमृता, जावई बाळू कांबळे व नातू राज यांच्यासह कृष्णा नाका परिसरातील शिखरे वस्तीत वास्तव्यास होत्या. कृष्णा नाक्यावरील सूर्या चायनिज सेंटरवर भांडी धुण्याचे काम त्या करीत होत्या. त्यांची मुलगी अमृता व जावई बाळू हे दोघेजण जागामालक अभिजित अष्टेकर यांच्या वीटभट्टीवर मजूर म्हणून कामास आहेत. 
शुक्रवारी रात्री घरकाम आटोपल्यानंतर रात्री १२ वाजण्याच्या सुमारास माया जगताप या घरासमोरील अंगणात झोपण्यास गेल्या. तर मुलगी अमृता, जावई बाळू व नातू राज हे तिघेजण घरामध्येच झोपले. शनिवारी सकाळी अमृता यांनी आईला हाक मारून दरवाजा उघडण्यास सांगितला. मात्र, बराचवेळ बाहेरून कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. 
अमृता यांच्या हाका ऐकून शेजारीच राहणार्‍या रेणुका कांबळे व वंदना सर्वगौड या दोन महिला त्याठिकाणी आल्या असता, माया जगताप यांच्या डोक्यातून रक्त येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. खून झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर अमृता यांनी याबाबतची खबर कर्‍हाड शहर पोलिसांत दिली. (प्रतिनिधी)

Web Title: The woman's mystery remains intriguing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.