मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयात महिलेचा गोंधळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:41 IST2021-09-18T04:41:45+5:302021-09-18T04:41:45+5:30
सातारा : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात शुक्रवारी दुपारच्या सुमारास एका महिलेने बराच वेळ गोंधळ घातला. अनेकांनी समजावूनही ...

मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयात महिलेचा गोंधळ !
सातारा : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात शुक्रवारी दुपारच्या सुमारास एका महिलेने बराच वेळ गोंधळ घातला. अनेकांनी समजावूनही संबंधित महिला ऐकत नव्हती. त्यामुळे महिला पोलिसांना बोलवावे लागले.
याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की, संबंधित महिलेचा पती जिल्हा परिषदेच्या सेवेत आहे. परंतु, काही कारणांनी त्याला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. या कारणातूनच शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास संबंधित महिला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांना भेटण्यास आली होती. या वेळी महिलेने बराच वेळ गोंधळ घातला. कार्यालयात उपस्थित असणाऱ्यांनी सांगितले की संबंधित महिला एकेरी भाषेत बोलत होती. तिला समजावून सांगूनही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. यामुळे गोंधळ माजला होता. शेवटी पोलिसांना बोलविण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी गाैडा यांच्या कार्यालयात महिलेने घातलेल्या गोंधळाचीच दिवसभर जिल्हा परिषदेत चर्चा होती.
.....................................................