शीर धडावेगळे करून महिलेचा खून

By Admin | Updated: July 14, 2016 00:02 IST2016-07-14T00:02:05+5:302016-07-14T00:02:05+5:30

सोनगाव कचरा डेपोजवळील घटना : घटनास्थळी कोयता सापडला

The woman's blood by a sharp head | शीर धडावेगळे करून महिलेचा खून

शीर धडावेगळे करून महिलेचा खून

शेंद्रे : येथील सोनगाव कचरा डेपोशेजारी कुरण परिसरात अत्यंत दाट झाडीमध्ये ३५ ते ४० वर्षीय महिलेचा शीर नसलेला मृतदेह आढळून आला असून, पोलिसांना घटनास्थळी कोयता सापडला आहे. त्या कोयत्यानेच खून केल्याचा पोलिसांचा संशय आहे.
सोनगाव कचरा डेपोजवळून जाताना नागरिकांना दुर्गंधी आल्याने जाऊन पाहिले असता एका महिलेचा अर्ध विवस्त्र मृतदेह दिसला. त्यानंतर त्या लोकांनी याची माहिती पोलिस पाटील यांना दिली. दुपारी तीनच्या सुमारास पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अत्यंत दाट करवंदीच्या झाडीमध्ये हा मृतदेह टाकण्यात आला होता.
शीर नसलेले धड असल्यामुळे पोलिसांची शंका अधिकच बळावली. काही अंतरावर झाडीमध्येच गंजलेल्या अवस्थेतील मोठा कोयता पोलिसांना सापडला. त्यामुळे या महिलेचा खूनच झाला असावा, अशी दाट शंका बळावली. पोलिसांनी परिसरात कोणी महिला बेपत्ता आहे का, याची चौकशी सुरू केली आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत संबंधित महिलेची ओळख पटली नव्हती. (वार्ताहर)

Web Title: The woman's blood by a sharp head