एटीएम चोरून परप्रांतीय युवकाकडून महिलेला गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:14 IST2021-02-18T05:14:18+5:302021-02-18T05:14:18+5:30
सातारा : शहरातील व्यंकटपुरा पेठेतील कलावती मंदिराशेजारी राहणाऱ्या एका विवाहित महिलेला परप्रांतीयाने गंडा घातला असून, तिच्या पर्समधून एटीएम चोरी ...

एटीएम चोरून परप्रांतीय युवकाकडून महिलेला गंडा
सातारा : शहरातील व्यंकटपुरा पेठेतील कलावती मंदिराशेजारी राहणाऱ्या एका विवाहित महिलेला परप्रांतीयाने गंडा घातला असून, तिच्या पर्समधून एटीएम चोरी करून दोन दिवसांत बँकेतून ४७ हजार ५00 रुपये लांबविले. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात एका परप्रांतियावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, आशा किरण यादव (वय ३७, रा. व्यंकटपुरा पेठ, कलावती आई मंदिराशेजारी, सातारा) यांच्या पर्समधील प्लास्टिक पाऊचमध्ये ठेवलेले एटीएम कार्ड मन्टू भोला साह (वय २२, रा. भैरवनाथ मंदिराशेजारी, करंजे पेठ, सातारा. मूळ रा. हरपूर करह, बनियापूर, सारन बिहार) याने दि. ३ रोजी चोरून नेले. दोन दिवसांत त्याने ४७ हजार ५00 रुपये एटीएममधून काढले. एटीएममधून पैसे काढून नेल्याचे आशा यादव यांच्या लक्षात येताच शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्यांनी तक्रार दाखल केली. पोलीस हवालदार काशीद अधिक तपास करीत आहेत.
................................