पतीसह मुलीच्या खुनाची धमकी देत महिलेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:37 IST2021-02-12T04:37:26+5:302021-02-12T04:37:26+5:30

सातारा: एका महिलेला तिचा पती व मुलीचा खून करण्याची धमकी देत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी ...

Woman threatened to kill daughter with husband | पतीसह मुलीच्या खुनाची धमकी देत महिलेवर अत्याचार

पतीसह मुलीच्या खुनाची धमकी देत महिलेवर अत्याचार

सातारा: एका महिलेला तिचा पती व मुलीचा खून करण्याची धमकी देत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पीडित महिलेने सातारा तालुका पोलीस ठाण्यात अमित शिवाजी बाबर (रा. सातारा) याच्याविरोधात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित महिला एका रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करते. संशयिताचे तिच्या घरी येणे जाणे सुरू असायचे. दरम्यान एकेदिवशी संशयिताने तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. पीडितेने त्या कृत्याबाबत बाबर याला जाब विचारला असता तुझ्या नवऱ्याला व मुलीला मारून टाकीन, अशी धमकी त्याने दिली. त्यानंतर त्याने सतत अशीच धमकी देत, त्या महिलेवर वेळोवेळी इतर ठिकाणी नेवून अत्याचार केले. दिनांक ९ रोजी पीडित महिला रुग्णालयात काम करत असताना संशयिताने तिथे जाऊन पीडितेला उद्देशून ‘तू माझ्यासोबत चल’, असे म्हणून गोंधळ घालण्यास सुरुवात करून तिची बदनामी केल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्‍वर दळवी हे अधिक तपास करत आहेत.

Web Title: Woman threatened to kill daughter with husband