सार्वजनिक शौचालयात महिलेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:29 IST2021-06-01T04:29:17+5:302021-06-01T04:29:17+5:30
सातारा : शहरालगत असणाऱ्या एका उपनगरात राहणाऱ्या एका महिलेचा सार्वजनिक शौचालयात विनयभंग केल्याप्रकरणी योगेश साहेबराव जाधव (रा. सातारा) याच्यावर ...

सार्वजनिक शौचालयात महिलेचा विनयभंग
सातारा : शहरालगत असणाऱ्या एका उपनगरात राहणाऱ्या एका महिलेचा सार्वजनिक शौचालयात विनयभंग केल्याप्रकरणी योगेश साहेबराव जाधव (रा. सातारा) याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, पीडित महिला रविवार दि. ३० रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास ती राहते त्या परिसरात असलेल्या सार्वजनिक शौचालयात गेली होती. त्यावेळी संशयिताने शौचालयाचा दरवाजा बंद करून पीडितेचा हात धरला आणि तिच्यासोबत अश्लील वर्तन केले. दरम्यान, योगेश जाधव याने यापूर्वीही पीडित महिलेसोबत अश्लील वर्तन केले होते. त्याचा जाब विचारण्यासाठी तिचा पती आणि मानलेला भाऊ गेला असता, योगेशची आई या दोघांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलीस उपधीक्षक गणेश किंद्रे यांनी भेट दिली. अधिक तपास महिला हवालदार जाधव हे करत आहेत.