तारळे : पाटण तालुक्यातील जळव घाटातील धोकादायक वळणावर मालवाहतूक पिकअप टेम्पो मंगळवारी सकाळी पलटी झाला. या अपघातात एक महिला जागीच ठार झाली, तर १८ जण जखमी झाले. पिकअप टेम्पोमधील सर्वजण कोरेगाव तालुक्यातील हिवरे येथून पाटण तालुक्यातील निवकणे येथील जानाईदेवीच्या दर्शनाला निघाले होते. तत्पूर्वीच काळाने घाला घातला.वंदना विठ्ठल काकडे (वय ५५, रा. हिवरे, तालुका-कोरेगाव), असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत उंब्रज पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हिवरे, ता. कोरेगाव येथील महिला व पुरुष एका पिकअप टेम्पोमधून दि. २४ मार्च रोजी सकाळी तारळे ते जळव या मार्गावरून निघाले होते. त्यावेळी जळव घाटात चालक बापू संभाजी खताळ (रा. हिवरे, ता. कोरेगाव) याचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो (एमएच ११-एजी-८८५२) पलटी झाला. या अपघातात वंदना काकडे या जागीच ठार झाल्या, तर प्रभावती काकडे, एकनाथ काकडे, वंदना काकडे, दाजी खताळ, केशव जगदाळे, आबाजी खताळ, शुकुबाई खताळ, छाया खताळ, शंकर खताळ, शालन खताळ, सिंधु शिंदे, विठ्ठल काकडे, लता खताळ, पंढरीनाथ काकडे, प्रल्हाद काकडे, रुक्मिणी काकडे, लोचन शिंदे, किरण शिंदे जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.संबंधित वाहनातून निवकणे ता. पाटण येथील जानाई देवीच्या दर्शनासाठी अवैध प्रवासी वाहतूक सुरू होती. याप्रकरणी चालक बापू संभाजी खताळ याच्याविरुद्ध उंब्रज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सागर खबाले हे करीत आहेत.
Web Summary : A pickup truck overturned in Jalav Ghat, Satara, killing a woman and injuring 18 others. The group was traveling to Nivakane for a pilgrimage when the accident occurred. The driver lost control, leading to the tragic incident. Police have registered a case against the driver.
Web Summary : सतारा के जलव घाट में एक पिकअप ट्रक पलटने से एक महिला की मौत हो गई और 18 अन्य घायल हो गए। समूह निवाकने तीर्थयात्रा के लिए जा रहा था जब दुर्घटना हुई। चालक ने नियंत्रण खो दिया, जिससे दुखद घटना हुई। पुलिस ने ड्राइवर के खिलाफ मामला दर्ज किया है।