किरकसालमध्ये लांडगा दिन उत्साहात साजरा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:45 IST2021-08-20T04:45:08+5:302021-08-20T04:45:08+5:30
म्हसवड : लांडग्याविषयी जागरूकता वाढविण्यासाठी आंतरराष्ट्रीय लांडगा दिवस साजरा केला जातो. महाराष्ट्रात प्रथमच यावर्षी माण तालुक्यातील किरकसालमध्ये हा दिवस ...

किरकसालमध्ये लांडगा दिन उत्साहात साजरा...
म्हसवड : लांडग्याविषयी जागरूकता वाढविण्यासाठी आंतरराष्ट्रीय लांडगा दिवस साजरा केला जातो. महाराष्ट्रात प्रथमच यावर्षी माण तालुक्यातील किरकसालमध्ये हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्ह्याचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते, मानद वन्यजीवरक्षक सुनील भोईटे, ग्रासलॅंडस् ट्रस्टचे मिलिंद राऊत, रोहित कोल्हटकर यांच्या उपस्थितीत डांभेवाडी घाट तसेच वाघजाई पाझर तलावावर वनभ्रमंती करण्यात आली. सूचना फलकाचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी मोहिते म्हणाले, ‘किरकसाल गावात समृद्ध जैवविविधता आहे. त्यांचे रक्षण व संवर्धनाचे काम गावकरी करत आहेत. त्यामुळे अशा गावात जैवविविधता संवर्धनात्मक प्रकल्प प्रकर्षाने राबविला जाईल. लोकसहभागातून किरकसाल हे लांडगा संवर्धन राखीव क्षेत्र होऊ शकते.’
यावेळी दहिवडीचे वनपरिक्षेत्र अधिकारी मारोती मुळे, डॉ. प्रवीण चव्हाण, अपूर्व चव्हाण, डॉ. अभिजीत माचणुरकर, डॉ. कौस्तुभ माचणुरकर, बी. के. शेख, अजित काटकर, सरपंच शोभा कुंभार, उपसरपंच अमोल काटकर, पक्षीमित्र चिन्मय सावंत, फुलपाखरू अभ्यासक विशाल काटकर, माजी सैनिक सुनील काटकर, धर्मराज काटकर उपस्थित होते.
१९ किरकसाल
किरकसाल येथे लांडगा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी उपवनसंरक्षक महादेव मोहिते, मानद वन्यजीवरक्षक सुनील भोईटे, मिलिंद राऊत, रोहित कोल्हटकर उपस्थित होते.