आरोग्य केंद्रांना जागा न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:13 IST2021-02-06T05:13:43+5:302021-02-06T05:13:43+5:30
आरोग्य समिती सभेत निर्णय : महिनाभरात कामांना सुरूवात करावी फोटो झेडपीचा... लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यातील काही आरोग्य ...

आरोग्य केंद्रांना जागा न
आरोग्य समिती सभेत निर्णय : महिनाभरात कामांना सुरूवात करावी
फोटो झेडपीचा...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यातील काही आरोग्य केंद्रांना वर्ष, दोन वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली आहे. परंतु, जागा नसल्याने या केंद्रांची कामे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे संबंधित गावाने जागा उपलब्ध करुन महिन्याभरात काम सुरू न केल्यास आरोग्य केंद्र दुसरीकडे हस्तांतरित केली जावीत, असा निर्णय आरोग्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य आणि बांधकाम समितीची मासिक सभा उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या दोन्ही सभांमध्ये विविध निर्णय घेण्यात आले. या सभांना कार्यकारी अभियंता अभय पेशवे, एन. डी. भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, सदस्य राजेश पवार, राजाभाऊ शेलार, शंकर जगदाळे, डॉ. अभय तावरे, शारदा ननावरे, उषा गावडे, भाग्यश्री मोहिते आदी उपस्थित होते.
आरोग्य समितीच्या सभेतही कोरोना विषयावर चर्चा झाली. यावेळी जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने शासनाच्या निर्देशाप्रमाणे त्याची अंमलबजावणी करावी, असे उपाध्यक्ष विधाते यांनी सांगितले.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र मंजूर आहेत. परंतु, ग्रामपंचायतींकडून इमारत बांधकामासाठी जागा उपलब्ध होत नसल्याबद्दलही या सभेत चर्चा झाली. यावर उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी प्राथमिक आरोग्य आणि उपकेंद्र मंजूर होऊन दोन-दोन वर्षे झाली तरीही अनेक ग्रामपंचायतींनी जागा उपलब्ध करुन दिलेली नाही. त्यामुळे बांधकाम करता येत नाही. त्यामुळे येत्या महिनाभरात संबंधित ग्रामपंचायतींनी आरोग्य केंद्रासाठी जागा उपलब्ध करुन काम सुरू करावे, तसे न झाल्यास शासनाच्या परवानगीने ही केंद्रे जागा उपलब्ध असतील तेथे हस्तांतरित केली जातील, असे स्पष्ट केले.
चौकट :
मार्चअखेर निधी खर्च करा...
बांधकाम समितीच्या सभेत उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी बांधकाम विभागाची मंजूर कामे मार्च महिन्याअखेर पूर्ण करावीत. तसेच सर्व निधी खर्च होण्यासाठी नियोजन करावे, अशी सूचना केली. ........................................................