विजेचा धक्का बसल्याने वायरमनचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:39 IST2021-05-10T04:39:46+5:302021-05-10T04:39:46+5:30
उंब्रज : खालकरवाडी (ता. कऱ्हाड) येथे वीज वितरण कंपनीच्या लोखंडी खांबावर दुरुस्तीचे काम करणाऱ्या इलेक्ट्रीशनला विद्युत धक्का बसला. त्यातच ...

विजेचा धक्का बसल्याने वायरमनचा मृत्यू
उंब्रज : खालकरवाडी (ता. कऱ्हाड) येथे वीज वितरण कंपनीच्या लोखंडी खांबावर दुरुस्तीचे काम करणाऱ्या इलेक्ट्रीशनला विद्युत धक्का बसला. त्यातच खांबावरून खाली पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. विष्णू रामचंद्र खालकर (वय ६०, रा. खालकरवाडी, ता. कऱ्हाड) असे आहे.
याबाबत उंब्रज पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शंकर रामचंद्र खालकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शंकर खालकर यांचे बंधू विष्णू खालकर हे वायरमन अशोक चव्हाण यांच्या हाताखाली इलेक्ट्रीशनचे काम करत असत. रविवारी दुपारी एकच्या सुमारास विष्णू खालकर हे खालकरवाडीमधील माळ नावाचे शिवारातील विद्युत खांबावर दुरुस्तीचे काम करत असताना शाॅक लागून खाली पडले. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड तपास करत आहेत.