शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

विजयाचा उन्माद.. पराजयाचा सुडाग्नी !

By admin | Updated: January 23, 2016 00:54 IST

बॅँकेची प्रतिष्ठा टिकवा : ‘जयाभाव’च्या खांद्यावर बंदूक ठेवणारे न लढताच युध्द जिंकले..

सातारा : बँकेच्या एका संचालकाला केवळ इतिवृत्त अन् सभेच्या नोटिसा व्यवस्थित मिळत नाहीत, या कारणावरून अवघा जिल्हा तब्बल ७६ तास ‘उपोषण’ नामक घटनेच्या दावणीला बांधला गेलेला. सुरुवातीला एका आमदाराला अत्यंत किरकोळीत काढू पाहणारी ‘बलाढ्य’ नेतेमंडळीही अखेर सपशेल झुकलेली. यामुळं ‘आपण चमत्कार घडविला?’ या मानसिकतेत ‘जयाभाव’च्या आंदोलनकर्त्यांनी ‘विजयाचा उन्माद’ करण्याची गरज नाही की, ‘चॅलेंज देणाऱ्यांना संपवा !’ असा ‘पराभवाचा सुडाग्नी’ही सत्ताधाऱ्यांनी धगधगत ठेवण्याची गरज नाही. नेत्यांच्या साठमारीत एक चांगली संस्था कामी येऊ नये, हीच तमाम सातारकरांची इच्छा; कारण ही बँक ना ‘गोरें’ची आहे, ना कोण्या ‘राजें’ची. ही तर सर्वसामान्य शेतकऱ्यांची आहे!‘मनी, मसल अन् मॅन’ या तीन ‘एम’ पॉवरवर जिल्ह््यात नेहमीच धुरळा उडवून लावणाऱ्या नेत्यांपैकी एक म्हणजे ‘जयाभाव’. आजपर्यंत नेहमीच ‘लाखो अन् कोट्यवधीं’च्या शब्दात रमणाऱ्या या ‘जयाभाव’ना चार दिवसांपूर्वी चक्क ‘हजारे’ बनण्याची हुक्की आली. होय. ‘अण्णा हजारें’ सारखंच कार्यकर्त्यांनाही ‘मी जयाभाव समर्थक’ टोप्या चढवून ‘डीसीसी ’समोर ते उपोषणाला बसले. ‘डोक्यावर टोपी’ अन् ‘गळ्यात मफलर’ अशा ‘केजरीवाल’ स्टाईलनं ‘जयाभाव’ची दाढी वाढू लागली. मात्र, सत्ताधारी मंडळी उपोषणाच्या मंडपाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असली तरी प्रशासन मात्र संकटात सापडलेलं. कारण ‘राष्ट्रवादी’च्या विरोधात उपोषण करणाऱ्या ‘काँग्रेस’च्या आमदाराला जर चुकून काही झालं असतं तर ‘भाजप-सेना’सरकारमधील अधिकाऱ्यांची पुरती वाट लागली असती. ‘वातावरणनिर्मिती’ अन् समोरच्यांवर ‘दबाव’ या दोन पॉइंटवर ‘जयाभाव’नी उपोषणाच्या ‘इव्हेंट’चं मॅनेजमेंट खूप छान राबविलेलं. कोणत्या कार्यकर्त्याला ‘कधी अन् कुठून साताऱ्यात आणायचं,’ याचं नियोजनही ग्रेट होतं. तसंच काही नेत्यांनाही या आंदोलनात उतरविण्याचं त्यांचं ‘टायमिंग’ही परफेक्ट होतं. मात्र, याचवेळी आपण आपल्या तालुक्यातला नेहमीचा राजकीय कलगीतुरा रंगवत नसून लाखो शेतकऱ्यांच्या आयुष्याशी निगडीत अशा एका आर्थिक बँकेच्या प्रतिमेचा ‘बभ्रा’ही करतोय, याची जाणीवही ठेवणं गरजेचं होतं. उपोषण सोडतानाही त्यांनी भविष्यातल्या आंदोलनाची भीती दाखविण्याचा आततायीपणा का केला, अशीही शंका अनेकांनी व्यक्त केली, ती यामुळेच. ९९ टक्के समाजकारण असणाऱ्या बँकेला राजकारणाचा अड्डा न बनविण्याची काळजीही त्यांना यापुढं घ्यावीच लागणार; कारण सांगली अन् कोल्हापूर जिल्हा बँकांसारखा प्रसंग इथंही यायला वेळ लागणार नाही. खरंतर, यात ‘जयाभाव’ही दोषी नाहीत; कारण सहकारातली सत्ता काबीज करण्याची ‘ट्रीक’ त्यांना सापडलीय; परंतु संस्था टिकविण्याचं ‘कसब’ अद्याप त्यांना गवसलेलं नाही.