पंचायत समिती आवारात मद्याच्या बाटल्या

By Admin | Updated: August 12, 2015 20:51 IST2015-08-12T20:51:04+5:302015-08-12T20:51:04+5:30

शिक्षण विभागाच्या आडोशालाच बाटल्या आडव्या

Wine bottles in the Panchayat Samiti premises | पंचायत समिती आवारात मद्याच्या बाटल्या

पंचायत समिती आवारात मद्याच्या बाटल्या

पाटण : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पाटण पंचायत समितीचे कार्यालय आहे. त्यातच प्राथमिक शिक्षण विभागाच्या सर्व शिक्षा अभियानाची इमारत जराशी बाजूलाच बांधलेली आहे. या इमारतीच्या आडोशाला गेल्या अनेक दिवसांपासून बिअरच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या अनेकांच्या निदर्शनास येत असून, त्यात आणखी बाटल्यांची भर पडत असल्यामुळे संशयाची सुई पंचायत समितीवर फिरू लागली आहे.पाटण पंचायत समितीत देसाई-पाटणकर गटांचा समान वाटा आहे. सभापती पाटणकर गटाच्या तर उपसभापती देसार्इंचे आहेत. त्यामुळे एकमेकांचे वाभाडे काढण्यात कोणीही कमी पडत नाही. अधिकाऱ्यांनासुद्धा धारेवर धरण्यात पंचायत समितीचे सदस्य आघाडीवर असतात. नुकतेच लाच घेताना सापडलेल्या गटशिक्षणाधिकाऱ्यांचे देखील वस्त्रहरण मासिक सभेत करण्यात आले. एवढे सगळे असूनसुद्धा शिक्षण विभागाच्या आडोशाला एका खणीत पडलेल्या एका कंपनीच्या रिकाम्या झालेल्या बाटल्याबाबत काही कोणी बोलेना? कृषी विभागाचं साहित्य ठेवण्याच्या गोदामाकडे जाताना या बाटल्या पायाखालीच असल्याचं निदर्शनास येत आहे. तरीुसद्धा या उचलण्याचे कोणी धाडस करत नाही. किंवा कर्मचाऱ्यांकरवी त्या हटविण्यात आलेल्या नाहीत. (प्रतिनिधी)


परिसर बंदिस्त नसल्याने उद्योग
पाटण पंचायत समितीचा परिसर बंदिस्त किंवा कुंपण घातलेले नाही. कोणीही कुठून येऊन पंचायत समितीत येतो. त्यामुळे आॅफिसची वेळ संपल्यानंतर
कर्मचारी, अधिकारी निघून गेले की, गैरकृत्य करणाऱ्यांची चंगळ होते. त्यातच मग बिअरच्या
बाटल्या आडव्या झाल्या नाही तर नवलंच. विशेष म्हणजे या परिसरात या बाटल्या स्वच्छही केल्या जात नाहीत.

Web Title: Wine bottles in the Panchayat Samiti premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.