धुंद हवा... पण धोका नवा! जोडी नंबर वन : शहराच्या आसपास फिरणार्‍या प्रेमिकांना पालकांपेक्षा बिबट्याची भीती अधिक

By Admin | Updated: May 9, 2014 00:03 IST2014-05-09T00:03:22+5:302014-05-09T00:03:22+5:30

राजीव मुळ्ये ल्ल सातारा कॉलेज बुडवून, चेहरा बांधून, ओळख लपवून डोंगरावर फिरणार्‍या जोडीला परवाच ‘त्या’ जोडीनं दर्शन दिलं. प्रेमिकांना पळता भुई थोडी झाली.

Windy wind ... but risk new! Jodi Number One: Lovers walking around the city are more afraid of leopard than their parents | धुंद हवा... पण धोका नवा! जोडी नंबर वन : शहराच्या आसपास फिरणार्‍या प्रेमिकांना पालकांपेक्षा बिबट्याची भीती अधिक

धुंद हवा... पण धोका नवा! जोडी नंबर वन : शहराच्या आसपास फिरणार्‍या प्रेमिकांना पालकांपेक्षा बिबट्याची भीती अधिक

राजीव मुळ्ये ल्ल सातारा कॉलेज बुडवून, चेहरा बांधून, ओळख लपवून डोंगरावर फिरणार्‍या जोडीला परवाच ‘त्या’ जोडीनं दर्शन दिलं. प्रेमिकांना पळता भुई थोडी झाली. या घटनेमुळं प्रेमवीर हादरले असले, तरी सध्याची आल्हाददायक हवा प्रेमिकांना डोंगराकडे खेचून घेतच आहे. शहरालगतच्या याच डोंगररांगांवर चार ते पाचच्या संख्येनं ‘ते’ आहेत, अशी पक्की माहिती वनखात्याकडे आहे. वन अधिकार्‍यांची ‘त्यांच्या’वर नजर आहेच; पण गुलाबी हवेत प्रेमाची गुटरगूँ करताना हा धोका नजरेआड करू नका, असा अधिकार्‍यांचा मुख्य सल्ला आहे. प्रेम कितीही पक्कं असलं, तरी बिबट्यासारखं श्वापद समोर आलं की दोघं दोन बाजूंना पळतात, हे मागील आठवड्यातील घटनेमुळं सिद्ध झालंय. त्यामुळं डोंगरांवर फिरायला जाणारे प्रेमीही धास्तावलेत. गेले काही दिवस ‘वॉट्सअप’वरून दोन बिबट्यांचा एक फोटो वेगवेगळ्या ग्रुप्सवरून फिरतो आहे. या फोटोची ‘लोकमत’ने शहानिशा केली आणि वनखात्याच्या अधिकार्‍यांकडून या फोटोतील सत्यासत्यताही पडताळून पाहिली. काही युवकांनी शहराच्या अगदी जवळ मोबाइलवर टिपलेलं हे छायाचित्र असल्याचं स्पष्ट झालं. प्रेमिकांचा पाठलाग करणारी ‘जोडी नंबर वन’ हीच असावी का, याबाबत अधिकार्‍यांचा विचारलं असता, दोनच नव्हे तर तब्बल चार ते पाचच्या संख्येनं बिबटे अगदी आपल्या जवळपास वावरत असल्याची माहिती मिळालीय. अधिकार्‍यांच्या मते, हे राजस श्वापद आपल्या इतक्या जवळ असल्याचा आपल्याला अभिमान असायला हवा. माणसाशी बिबट्याची कोणतीही दुष्मनी नाही. काही पथ्यं पाळली, तर बिबट्या माणसाला काही करत नाही. गावोगावचे खबरे आणि वन्यजीवप्रेमींकडून वनखाते सातत्यानं माहिती जमवीत असते. बिबट्यांवर लक्ष ठेवलं जातं. सातारा शहर आणि लगतची काही गावं अशा परिसराचा विचार केल्यास किमान चार-पाच बिबटे सतत आसपास फिरत आहेत. परंतु त्यांनी पाळीव जनावरे वगळता माणसांवर यापूर्वी कधीच हल्ला केलेला नाही. त्यामुळं बिबट्याला उपद्रव होऊ न देता त्याच्यापासून स्वत:चा बचाव करण्याचा सल्ला वनखात्यानं दिलाय.

Web Title: Windy wind ... but risk new! Jodi Number One: Lovers walking around the city are more afraid of leopard than their parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.