शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पवनचक्की कंपन्यांकडून वणवे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2015 00:33 IST

मोरणा पठारावरील प्रकार : लाखोंची वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी

पाटण : पर्यावरण रक्षणाची कसलीही बांधिलकी आणि भान नसलेल्या पवनचक्की कंपन्यांच्या व्यवस्थापनाने सध्या मोरणा पठारावरील डोंगरांना वणवे लावण्याची मालिका सुरू केली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या जंगलांना धोका निर्माण झाला आहे. या वणव्यांमुळे लाखो रुपये किमतीच्या वनसंपदेची हानी होणार आहे. याबाबत वनविभागाचे कर्मचारी अद्याप तरी बेसावध आहेत.अगोदरच जंगलव्याप्त पण उंच ठिकाणे पवनचक्की प्रकल्पांसाठी दिली गेली. त्यानंतर प्रचंड प्रमाणात लाकूडतोड करून पठार मोकळे करण्यात आले. आता पवनचक्क्या त्या ठिकाणी गरगर फिरू लागल्या आहेत. मात्र, त्याअगोदर झालेल्या वनसंपदेच्या हानीला जबाबदार कोण, याचे उत्तर कोणाकडेच नाही. आता कब्जा केलेल्या हजारो हेक्टरच्या डोंगरावर पवनचक्की कंपन्यांचे कर्मचारी रात्रीच्या सुमारास वणवे लावत आहेत. लावलेला वणवा तातडीने न विझविता तो तसाच पुढे सरकत गेल्यामुळे आजूबाजूचे जंगल वणव्यात खाक होत आहे.दरवर्षी अशा प्रकारे वणवे लावले जातात. वाल्मीक पठार, गवळीनगरचा सडा, आंब्रगचा डोंगर आणि रिसवडचा परिसर हा जंगलव्याप्त परिसर आहे. आता अभयारण्यातून दहा किलोमीटर अंतरात कसलेही बांधकाम, उत्खनन किंवा लाकूडतोड, वणवे लावण्यास शासनाने नुकतेच बंधन घातले आहे. तरीसुद्धा पवनचक्की कंपन्यांचे प्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. डोंगरांना वणवे लागल्यास स्थानिक गावकरी आणि वनसंरक्षण समित्या वणवे विझविण्यासाठी धडपडताना दिसतात; मात्र दुसरीकडे पवनचक्की कंपन्यांकडून तसे प्रयत्न होत नाही. वणवे लावण्यास प्रतिबंध केला पाहिजे, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)पवनचक्क्या निसर्गाला घातकअभयारण्य व जंगलव्याप्त परिसरालगत मोरणा पठारावर अनेक पवनचक्क्या उभ्या आहेत. या पवनचक्क्यांची अजस्र पाती वाऱ्यावर फिरतात. या फिरण्याचा आवाज शेजारी असणाऱ्या गावांत मोठ्या प्रमाणावर येतो. रात्रीच्या वेळी पवनचक्क्यांचा गोंगाट वादळ आल्यासारखा जाणवतो. तसेच रात्रीच्या टॉर्च, सर्चलाइट सुरू असतात. त्याचा परिणाम नजीकच्या जंगलांत राहणाऱ्या प्राणी-पक्ष्यांवर होत आहे.शेकोट्यांचे रूपांतर वणव्यातनुकताच पावसाळा सरून हिवाळा सुरू झाला आहे. आता डोंगरावर वाढलेले गवत वाळू लागले आहे. मग रात्रीच्या ड्यूटीवर असलेले पवनचक्की कंपन्यांचे प्रतिनिधी, सुपरवाइझर आणि वॉचमन थंडीपासून बचाव करण्यासाठी डोंगरावर शेकोट्या करतात आणि त्याचे रूपांतर वणव्यात होते.