शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

पांढरेपाणीला आशेचा किरण दिसणार की नाही?

By admin | Updated: October 12, 2015 00:30 IST

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प : परिसरातील गावांचे पुनर्वसन; पांढरेपाणीकडे मात्र अजूनही दुर्लक्ष

पाटण : दिवस असो की रात्र, कधीही जंगली प्राणी घरात घुसतात. अशा भयावह स्थितीत जीवन जगणाऱ्या पांढरेपाणी या पाटण तालुक्यातील गावाचा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा (कोअर) क्षेत्रात समावेश आहे. या गावालगतच्या मळे-कोळणे, पाथरपूंज आदी गावांचे नुकतेच पुनर्वसन म्हणून घोषित झाल्याचे आमदार शंभूराज देसाई यांनी जाहीर केले. मात्र आमदारांना शंभर टक्के मतदान करणाऱ्या पांढरेपाणीकरांचा विचार होईल, असे दिसत नाही. मग त्यांच्यासाठी आशेचा किरण कधी उजाडणार? असा सवाल व्यक्त होत आहे.चांदोली अभयारण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर पांढरेपाणी ही वस्ती वसलेली आहे. या गावातील लोकांची उभी हयात जंगलातील प्राण्यांचा सामना करण्यात गेली. १९८५ दरम्यान पांढरेपाणी गावालगतची गावे उठविण्यात आली आणि अभयारण्य करण्यात आले. त्यावेळी पांढरेपाणीकरांची कुणी गांभीर्याने दखल घेतली नाही. तेव्हापासून आजपर्यंत चांदोली अभयारण्यातील वन्यप्राण्यांचा जीवघेणा त्रास हे लोक सहन करत आहेत. अनेकजण दगावले तर शेकडो मेंढ्या व पाळीव जनावरे जिवाला मुकली. त्यानंतर या गावच्या शेजारील मळे-कोळणे, पाथंरपूंज या गावांचे पुनर्वसन करण्याच्या घोषणा झाल्या. त्यामुळे आता तर पांढरेपाणीकरांच्या मानगुटीवरील फास अधिकच आवळला गेला आहे. एकटे गाव आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील प्राण्यांच्या तावडीत सापडले आहे. या गावाला कुणी वाली दिसत नाही. विभागातील लोकप्रतिनिधी पांढरेपाणी गावच्या पुनर्वसनाबाबत कधी चकार शब्द काढताना दिसले नाहीत. त्यामुळे भविष्यकाळात पांढरेपाणी गावातील जनतेचे काय हाल होणार, हे कोण जाणे? (प्रतिनिधी)पांढरेपाणी गावाचे पुनर्वसन करावेच लागणार आहे. हे तालुक्याच्या आजी-माजी आमदारांना चांगलेच ठाऊक आहे. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारीसुद्धा पांढरेपाणीकर कसे जीवन जगतात, हे अगदी जवळून पाहतात. अनेक वर्षांपासूनची आमची पुनर्वसन करा, अशी मागणी आहे. मात्र याची दखल का घेतली जात नाही? हेच समजून येत नाही.-रामचंद्र शेळकेमाजी ग्रामपंचायत सदस्य, पांढरेपाणी प्रत्यक्ष गावात जा, म्हणजे समजेल... पांढरेपाणी गावात प्रत्यक्ष जाऊन तेथील लोकांच्या भावना ऐकून घेतल्या तर आणि जंगलाचा वेढा गावाला कसा पडला आहे, हे दिसेल. त्याहीपुढे जाऊन फक्त एकच रात्र त्या लोकांबरोबर सहवास करायचा तरंच शासनाच्या अधिकाऱ्यांना व लोकप्रतिनिधींना व्यथा कळतील.