शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Satara: मलकापुरातील उड्डाणपुलाचे गरडर मशीन उतरवणार?, वाहतुकीबाबत वाहनचालकांमध्ये संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 14:29 IST

मलकापूर : मलकापुरातील युनिक उड्डाणपुलाचे सिगमेंट बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. या कामासाठी वापरलेले भले मोठे गरडर मशीन उतरवण्यात ...

मलकापूर : मलकापुरातील युनिक उड्डाणपुलाचे सिगमेंट बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. या कामासाठी वापरलेले भले मोठे गरडर मशीन उतरवण्यात येणार असून या मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याचे मेसेज समाज माध्यमावर व्हायरल झाल्यामुळे वाहनधारकासह नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्लिपरोड सुरु करूनच नियोजनबद्द काम करावे अशी मागणी होत आहे. मलकापूर, ता. कराड येथील युनिक उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून सिगमेंट बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. या उड्डाणपूलाच्या सर्वच ९२ पिलरचे पायलिंग, कास्टिंग व कॕपसह उभे राहिले आहेत. अत्याधुनिक दोन गरडर मशिनद्वारे सिगमेंट बसवून पुलाचे एका ठिकाणी ५२ तर दुसऱ्या ठिकाणी ४० असे ९२ गाळे तयार झाले आहेत. बेअरिंग व जोड बसवण्याबरोबरच संरक्षक कठड्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. दोन्ही बाजूच्या भरावपुलाची कामे सुरू आहेत. सध्या गरडर मशीनचे काम संपले आहे. ते करडर मशीन उड्डाण पुलावरून खाली उतरवण्याचा घाट संबंधित कंत्राटदाराने घातला आहे. त्याबाबतची जुळवाजुळव सुरू आहे. भल्या मोठ्या क्रेनने हे गरडर मशीन उतरवण्यात येणार आहे. मात्र संबंधित कंत्राटदाराकडून कोणतीही पूर्वसूचना वाहतूक नियंत्रण कक्षाला दिलेली नाही. किंवा वाहतूक व्यवस्थेत बदल केलेले कोणतेही दिशादर्शक फलक लावलेले नाहीत. आज, शुक्रवार (दि. २५) हे काम १५ ते २० दिवस चालणार असल्याचे मेसेज समाज माध्यमावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 

महामार्गाचे काम करणारे कंत्राटदार वाहतुकीचे पुर्वनियोजन न करताच मनमानीपणे बदल करत आहेत. गरडर मशीन उतरवण्यासाठी कसलीही लेखी कल्पना दिलेली नाही. प्रथम स्लिपरोड वरून वाहतूक सुरु करावी. वाहतुकीत केलेल्या बदलाचे दिशादर्शक फलक लावूनच हे काम करावे. - संदीप सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक कराड वाहतूक शाखा सध्या गरडर मशीनने सिगमेंट बसवण्याचे काम संपले आहे. भल्या मोठ्या क्रेनने हे गरडर मशीन उतरावे लागणार आहे. त्यासाठी शिवछावा चौकात क्रेन बसवत आहोत. अजून किमान चार दिवस लागतील. वाहतुकीचे नियोजन करूनच हे काम करणार आहोत. - सुरेंद्र आपटे, प्रोजेक्ट मॅनेजर